• Download App
    Advised to PM to talk about work but not properly vaccinated in the state, 34 per cent corona vaccine wasted in Jharkhand

    पंतप्रधानांना काम की बात करण्याचा सल्ला पण राज्यात नीट लसीकरण जमेना, झारखंडमध्ये तब्बल ३४ टक्के कोरोना प्रतिबंधक लसी गेल्या वाया

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून फोन केल्यावर त्यांनी मन की बात केली, त्यापेक्षा काम की बात करायला हवी होती असे म्हणणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंडमध्ये कोरोना लसीकरणाच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसी वाया जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. Advised to PM to talk about work but not properly vaccinated in the state, 34 per cent corona vaccine wasted in Jharkhand


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून फोन केल्यावर त्यांनी मन की बात केली, त्यापेक्षा काम की बात करायला हवी होती असे म्हणणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंडमध्ये कोरोना लसीकरणाच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसी वाया जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

    एका बाजुला देशात कोरोना प्रतिबंधक लसींची टंचाई आहे. मात्र, अनेक राज्यांना लसवापराचे गांभिर्य नाही. झारखंडमध्ये तर तब्बल ३४ टक्के लसी वाया गेल्या आहेत. केंद्र सरकारने झारखंड सरकारला चांगलेच फटकारले आहे.



    केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसी पाठविण्यात आल्या होत्या. या लसींच्या वापराचा अहवाल केंद्र सरकारने प्रसिध्द केला आहे. त्यानुसार झारखंड राज्यात सर्वादिक ३४ टक्के लसी वाया गेल्या आहेत.

    पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांनी मात्र एकही लस वाया घालविली नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये १ लाख ६२ हजार तर केरळमध्ये १ लाख १० हजार लसी शिल्लक राहू शकल्या.

    केंद्र शासन राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसी पाठवित आहे. लसीकरण करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. मात्र, अनेक राज्यांत त्यासाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे लसी वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. झारखंडमध्येही अशाच पध्दतीने लाखो लसी वाया गेल्या आहेत. त्यामुळे येथील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.

    झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लस वाया गेल्याचा अहवाल नाकारला आहे. राज्यात यापूर्वी लस वाया जाण्याचे प्रमाण चार टक्यांवर होते. आता ते एक टक्यांवर आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    Advised to PM to talk about work but not properly vaccinated in the state, 34 per cent corona vaccine wasted in Jharkhand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही