• Download App
    The construction of the new house of the Prime Minister is in full swing

    पंतप्रधानांच्या नव्या घराचे बांधकाम जोरात ; ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ १५ एकर जमिनीवर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले. त्यानंतर देशात कायापालट होण्यास सुरुवात झाली. सरकारने सतत नाविन्याचा ध्यास घेतला आहे. जनकल्याणाचे नवे प्रकल्प सुरू केले. त्याच बरोबर संसदेची नवी इमारत असो की, पंतप्रधानांसाठी नवे निवासस्थान ! चमकलात ना ? पण , हे खरे आहे. भारताच्या पंतप्रधानांसाठी नवे घर बांधले जात आहे. The construction of the new house of the Prime Minister is in full swing



    राजधानी दिल्लीत सध्या पंतप्रधानांच्या नव्या घराचे बांधकाम जोरात सुरु आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ या नावाने पंतप्रधानांच्या नवीन घराचे बांधकाम केले जात आहे. कोरोनाचे संकट असताना या नव्या बांधकामाला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. परंतु, या घरासाठी पर्यावरणासंबंधी सर्व मंजुऱ्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे हे बांधकाम ‘अत्यावश्यक सेवा’ अधिनियमात समाविष्ट केले आहे. त्यामुळे ते कुणीही रोखू शकत नाही.

    ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’चे बांधकामाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला. या प्रकल्पात पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानासह त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा पथकाचे मुख्यालय तसेच उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानाचाही समावेश आहे.

    पंतप्रधानांचे नवे घर दृष्टिक्षेपात

    एकूण जागा : 15 एकर जमिन

    प्रकल्पाचे नाव : सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट

    एकूण इमारती : दहा चारमजली इमारती

    एक सचिवालय : शास्त्री भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, कृषि भवन या इमारती पाडून एक संयुक्त केंद्रीय सचिवालय उभाणार आहे.

    खर्च : 13 हजार 450 कोटी रुपये

    रोजगारांची निर्मिती : 46 हजार जणांना फायदा

    The construction of the new house of the Prime Minister is in full swing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली