विशेष प्रतिनिधी
परभणी : परभणीतील दंगली दरम्यान सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनीच तो दलित असल्यामुळे हत्या केली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेले वक्तव्य पूर्ण खोटे आहे, असा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी संबंधित प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा निष्कर्ष येण्यापूर्वीच केला. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अडीच तीन तासांचा महाराष्ट्र दौरा आटोपून ते निघून गेले.
परभणी एका मनोरुग्णाने संविधान स्मृती स्तंभाची विटंबना केल्यानंतर मोठे दंगल झालीह त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. या संदर्भात महायुती सरकारने चौकशी आणि तपास करण्यासाठी न्यायालयीन यंत्रणा नेमली. या यंत्रणेने चौकशी आणि तपास सुरू केला. तिचा निष्कर्ष अद्याप हाती येणे बाकी आहे, पण तरी देखील राहुल गांधींनी परभणीत येऊन सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि तो दलित असल्यामुळेच पोलिसांनी त्याची हत्या केली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत दिलेले वक्तव्य खोटे आहे, ते पोलिसांना वाचवत आहेत, असा आरोप केला.
या दौऱ्यामध्ये त्यांच्या समाजात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर वगैरे नेते होते.
Young man was killed because he was Dalit : Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
- Bangladeshis : दिल्लीत अवैध बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन
- Pune book festival : वाचन प्रेमींकडून २५ लाख पुस्तकांची खरेदी ; ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल
- Kejriwal दिल्लीची निवडणूक जिंकली तरी केजरीवाल खुर्ची पासून दूरच; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा!!