• Download App
    तुमच्याकडे सिध्दू आणि आमच्याकडे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, राजीव चंद्रशेखर यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली|You have Sidhu and we have a fast growing economy, Rajiv Chandrasekhar mocked Imran Khan

    तुमच्याकडे सिध्दू आणि आमच्याकडे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, राजीव चंद्रशेखर यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तुमच्याकडे सिद्धू ) आहेत आणि आमच्याकडे फक्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, युनिकॉर्न्स (एक अब्ज उलाढाल असलेल्या कंपन्या) आणि एफडीआय आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खिल्ली उडविली आहे.You have Sidhu and we have a fast growing economy, Rajiv Chandrasekhar mocked Imran Khan

    पाकिस्तान दिवाळखोर झाल्याचे स्पष्ट असतानाही आपल्या देशाची आर्थिक स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे. त्यावर इम्रान खान यांना प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर यांनी पंजाब कॉँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांच्यावरही निशाणा साधला आहे.



    नवज्योत सिंग सिद्धू यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इम्रान खानला आपला मोठा भाऊ म्हणून संबोधले होते, ज्यानंतर बराच वाद झाला होता. त्यानंतर सिद्धू पाकिस्तानातील करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देण्यासाठी आले होते.

    आंतरराष्ट्रीय चेंबर समिट २०२२ च्या उद्घाटन समारंभात बोलताना इम्रान खान म्हणाले की अभूतपूर्व आव्हाने असूनही, पाकिस्तानची आर्थिक स्थिती या प्रदेशातील अनेक देशांपेक्षा, विशेषत: भारतापेक्षा चांगली आहे. पाकिस्तान अजूनही स्वस्त देशांपैकी एक आहे.

    ते (विरोधक) आम्हाला सक्षम नसल्याचे म्हणतात पण सत्य हे आहे की आमच्या सरकारने देशाला सर्व संकटांपासून वाचवले आहे. इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये तेलाच्या किमती कमी आहेत महागाईवरून पाकिस्तानातील विरोधक इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. इम्रान खान यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत.

    You have Sidhu and we have a fast growing economy, Rajiv Chandrasekhar mocked Imran Khan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!