• Download App
    धान खरेदीत कमीशन द्यावे लागले नाही ना? पंतप्रधानांनी फोन केला आणि वृध्द शेतकऱ्याच्या डोळ्यातून आले पाणी|You don't have to pay commission for buying paddy, do you? The Prime Minister called and tears came from the eyes of the old farmer

    धान खरेदीत कमीशन द्यावे लागले नाही ना? पंतप्रधानांनी फोन केला आणि वृध्द शेतकऱ्याच्या डोळ्यातून आले पाणी

    विशेष प्रतिनिधी

    रायबरेली : नमस्कार! मी नरेंद्र मोदी बोलतोय्. धान खरेदीत कोणतेही कमिशन द्यावे लागले नाही ना! असा फोन वृध्द शेतकऱ्याला आला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आले. धान खरेदीसाठी मला कोणतेही कमिशन द्यावे लागत नसल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.You don’t have to pay commission for buying paddy, do you? The Prime Minister called and tears came from the eyes of the old farmer

    उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात इचोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बछरावण येथील सेवानिवृत्त शिक्षक 83 वर्षीय शशिभूषण शुक्ला यांची शेती आहे. शशिभूषण यांनी आठवड्याभरापूर्वी धान खरेदी केंद्रावर 70 क्विंटल धान एक लाख 76 हजार रुपयांना विकले होते.



    शशिभूषण यांनी सांगितले की, दुपारी जेवण करून आराम करत असताना अचानक फोन वाजला. नमस्कार! करून मी बोलणार इतक्यात दुसरीकडून आवाज आला की, मी नरेंद्र मोदी बोलतोय. हे ऐकून शुक्ला यांना वाटले की कोणीतरी चेष्ठा करत असेल, पण त्यांनी मोदींचा आवाज ओळखला.

    शशिभूषण यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी फोनवर विचारले की, तुम्ही विकलेल्या धानासाठी काही कमिशन द्यावे लागेल का? कोणत्याही मध्यस्थाची मदत घेण्याची गरज पडली का? कोणतेही कमिशन द्यावे लागले नाही. पंतप्रधांनी त्यांच्या तब्येतीची विचारणाही केली.

    You don’t have to pay commission for buying paddy, do you? The Prime Minister called and tears came from the eyes of the old farmer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : ‘मी नेहरूंचा अंध समर्थक नाही, पण त्यांची लोकशाहीतील भूमिका अमूल्य’ – शशी थरूर यांची भाजपवर संयत टीका

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- नेहरूंच्या चुका स्वीकारणे आवश्यक, पण प्रत्येक समस्येसाठी त्यांना एकट्याला दोषी ठरवणे चुकीचे

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते