• Download App
    'तुम्ही फक्त ट्रोलिंगपुरते राहिलात', ज्योतिरादित्य शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल; विचारले तीन प्रश्नYou are just For trolling, Jyotiraditya Scindia's attack on Rahul Gandhi; asked Three questions

    ‘तुम्ही फक्त ट्रोलिंगपुरते राहिलात’, ज्योतिरादित्य शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल; विचारले तीन प्रश्न

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी अदानीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले की, हे स्पष्ट आहे की आता तुम्ही ट्रोलपुरते उरला आहात. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष वळवण्याऐवजी तुम्ही या तीन प्रश्नांची उत्तरे का देत नाही?You are just For trolling, Jyotiraditya Scindia’s attack on Rahul Gandhi; asked Three questions



    अपमानास्पद विधानाबद्दल माफी का मागत नाही- शिंदे

    ज्योतिरादित्य शिंदे यांनी पहिला प्रश्न विचारला की, मागासवर्गीयांच्या संदर्भात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल तुम्ही माफी का मागत नाही? उलट म्हणतात की मी सावरकर नाही, माफी मागणार नाही. देशभक्ताचा अपमान आणि इतका अहंकार. दुसरा प्रश्न, ज्या न्यायालयाकडे काँग्रेसने नेहमीच बोटे दाखवली, ते आज आपल्या स्वार्थासाठी त्यावर दबाव का आणत आहेत?

    शिंदे यांचा राहुल गांधींना तिसरा प्रश्न

    शिंदे यांनी तिसरा प्रश्न विचारला की तुमच्यासाठी नियम वेगळे का असावेत? तुम्ही स्वतःला प्रथम श्रेणीचे नागरिक समजता का? तुम्ही अहंकारात इतके गुरफटले आहात की कदाचित या प्रश्नांचे महत्त्वही तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे. याआधीही ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला होता.

    काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांवर राहुल गांधींची टीका

    राहुल गांधींनी 8 एप्रिल रोजी ट्विट केले होते, ज्यात त्यांनी काँग्रेस सोडलेल्या नेत्यांना, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांना लक्ष्य केले होते. अदानींच्या नावाशी जोडून त्यांनी लिहिले की, ते सत्य लपवतात, त्यामुळेच ते रोज दिशाभूल करतात, प्रश्न असा आहे की अदानींच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींचा बेनामी पैसा कोणाचा आहे?

    दरम्यान, अदानी समूहाने त्या 20 हजार कोटी रुपयांचा हिशेब एका निवेदनाद्वारे दिला आहे. हे सर्व पैसे कंपन्यांनी समभाग विकून उभारल्याचे समूहाने म्हटले आहे.

    You are just For trolling, Jyotiraditya Scindia’s attack on Rahul Gandhi; asked Three questions

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!