रविवारी दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, यानंतर भारतातील विविध राज्यात फटाके फोडून पाकिस्तानचा विजय साजरा केल्याच्या घटना घडल्या.Yogi government’s big action against those celebrating Pakistan’s victory
वृत्तसंस्था
कानपूर : टी 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर अनेक राज्यात पाकिस्तानचा विजयोस्तव साजरा केल्याच्या घटना घडल्या. टी 20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांवर योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
योगी सरकारकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, अनेकांची धरपकडही सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी आग्रा येथील तीन, बरेलीतील तीन आणि लखनऊमधील एकाची नावे घेतल्याचे सांगण्यात येत आहे
राजस्थानमधील उदयपूरमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाला सपोर्ट करणाऱ्या नफिसा अटारी या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. उदयपूरच्या अंबामाता पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. नफीसाने मॅचनंतर व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानचे समर्थन करणारे एक स्टेटस पोस्ट केले. पाकिस्तानच्या विजयाबद्दल तिने आनंद व्यक्त केल्यानंतर नफिसाला तिच्या शाळेने नोकरीतून काढून टाकले. भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला, फटाके फोडण्यात आले. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील करण नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस श्रीनगर सौरा यांच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचा विजय साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
Yogi government’s big action against those celebrating Pakistan’s victory
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE : समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो
- वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका
- बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच