Monday, 5 May 2025
  • Download App
    सांगलीत योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल, म्हणाले- काँग्रेस सत्तेत आल्यास जाती-जातीत विभाजन करेल |Yogi Adityanath's attack in Sangli said- Congress will divide into castes if it comes to power

    सांगलीत योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल, म्हणाले- काँग्रेस सत्तेत आल्यास जाती-जातीत विभाजन करेल

    Yogi Adityanath's attack in Sangli said

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस विभाजन करण्याचा डाव आखत आहे. जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची घोषणा करून काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल, असा घणाघात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.Yogi Adityanath’s attack in Sangli said- Congress will divide into castes if it comes to power

    सांगलीमध्ये भाजप खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 2014 च्या आधी देशाचा सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. 2014 नंतर परिस्थिती बदलली देशाची सीमा सुरक्षित झाल्या आहेत. दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला.



    काँग्रेसकडून विभाजन करण्याचा डाव

    सीएम योगी म्हणाले की, काँग्रेस गो हत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठे पाप काँगेस करत आहे. काँग्रेस आता खोटं बोलता येईल तितके बोलत आहे, कारण या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होईल अशी त्यांनी भीती आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचे धाडस करत नाही.

    ..तर सर्वात आधी पाक स्पष्टीकरण देते

    योगी आदित्यनाथ म्हणाले की, सर्वांत यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारतात कुठे बॉम्बस्फोट झाला, तर पाकिस्तान पहिल्यांदा स्पष्टीकरण देते की आम्ही हे केलं नाही. देशातला शेतकरी आत्महत्या करत नाही, जवानांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. देशावर कुठले संकट आले तर राहुल गांधी पहिले देश सोडून जातात. कोरोना काळात राहुल गांधी इटलीला निघून गेले. राहुल गांधी परदेशात भारताचा अवमान करतात, सबका साथ सबका विकास पंतप्रधान मोदींचा मंत्र होता. त्यामुळे दहा वर्षात अनेक गोष्टी बदलून गेल्या.

    गडकरींच्या कामाचे केले कौतुक

    मोदींच्या नेतृत्वाखाली गडकरींनी अनेक हायवे बांधले. आज देशात दुप्पट हायवे झालेआहेत. आधी पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती, आज 20 शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. काँग्रेसने राम मंदिराची उभारणी का केली नाही? काँग्रेस गो हत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठे पाप काँगेस करत आहे. काँग्रेस आता खोटं बोलता येईल तितके बोलतय, कारण या निवडणुकीनंतर काँग्रेस एक इतिहासजमा होईल अशी त्यांनी भीती आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

    Yogi Adityanath’s attack in Sangli said- Congress will divide into castes if it comes to power

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!

    Icon News Hub