• Download App
    अमरनाथ यात्रेकरूंसाठी श्रीनगरच्या पंथा चौकात मोठ्या यात्री निवासाचे भूमिपूजन; 3000 यात्रेकरूंची सोय। Yatri niwas for amarnath pilgrimage will come up shirnagar

    अमरनाथ यात्रेकरूंसाठी श्रीनगरच्या पंथा चौकात मोठ्या यात्री निवासाचे भूमिपूजन; 3000 यात्रेकरूंची सोय

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटवून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर तेथे विकास कामांचा धडाका सुरू असून त्यापैकी एक काम म्हणजे अमरनाथ यात्रेकरूंसाठी यात्री निवास. अमरनाथ यात्रेकरूंसाठी श्रीनगरच्या पंथा चौकात मोठे यात्री निवास लवकरच सेवेस उपलब्ध होणार आहे. यात्री निवासाचे आणि अमरनाथ यात्रेचे ऑफिस यांचे भूमिपूजन उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. Yatri niwas for amarnath pilgrimage will come up shirnagar

    तब्बल तीन हजार यात्रेकरूंसाठी यात्री निवासात सर्व सुविधा असतील. यामध्ये निवास, भोजन तसेच अमरनाथ यात्रेचे सर्व प्रकारचे बुकिंग आणि अन्य पर्यटन विषयक सुविधा उपलब्ध होतील. येत्या 18 महिन्यात यात्रीनिवास चे काम पूर्ण होऊन ते यात्रेकरूंच्या सेवेत उपलब्ध होईल.



    अशाच प्रकारच्या यात्री निवासाचे काम जम्मू विभागातील रामबान जिल्ह्यात चंद्रकोट येथे सुरू असून तेथे 3200 यात्रेकरूंची सोय होईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुविधा तयार करण्याचे काम सुरू आहे. चंद्रकोट येथील यात्री निवास देखील लवकरच पूर्ण होईल आणि ते यात्रेकरूंच्या सेवेत उपलब्ध होईल. अमरनाथ यात्रेकरूंसाठी ऑनलाईन पूजा, हवन यांची सुविधा अमरनाथ देवस्थान मंडळाने केली आहे.

    अमरनाथ पोर्टल 24 तास खुले राहून त्यावर बुकिंग करता येऊ शकेल. यात्रेकरूंना प्रसाद घरपोच देण्यात येईल. श्रीनगर आणि जम्मू या विभागांमध्ये यात्रेकरूंसाठी यात्री निवास बांधण्यात यावे, अशी मागणी बरीच जुनी आहे. परंतु जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर या कामाला वेग आला आहे. श्रीनगरमधले यात्री निवास अठरा महिन्यात पूर्ण होईल आणि सेवेत येईल, असे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्पष्ट केले. विशिष्ट टप्प्यानंतर अमरनाथ साठी रोप वे ची देखील योजना असल्याचे जम्मू-काश्मीरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Yatri niwas for amarnath pilgrimage will come up shirnagar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    लैंगिक शोषणप्रकरणी आरोपी बृजभूषण यांची याचिका फेटाळली; खासदारांनी पुन्हा चौकशीची केली होती मागणी, 7 मे रोजी आरोप निश्चिती

    संदेशखालीमध्ये CBIची NSG कमांडोसह झाडाझडती; अनेक ठिकाणी शस्त्रे व दारूगोळा सापडला

    विजय माल्ल्याला फ्रान्सच्या माध्यमातून परत आणण्याची तयारी; भारताने बिनशर्त प्रत्यार्पण मागितले