वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Yasin Malik २०२२ पासून अतिरेकी निधी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा काश्मिरी फुटीरतावादी नेता यासीन मलिकने दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्याने दावा केला आहे की १९९० ते २००६ पर्यंत सात सरकारांनी त्याला काश्मीर चर्चा आणि शांतता प्रक्रियेत सहभागी करून घेतले.Yasin Malik
ते म्हणाले, “पंतप्रधान व्हीपी सिंह, चंद्रशेखर, नरसिंह राव, देवेगौडा, गुजराल, वाजपेयी आणि मनमोहन सिंगांनी चर्चेत सहभागी करून घेतले. मी २००६ मध्ये पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि दहशतवादी हाफिज सईदला भेटलो. ही बैठक गुप्तचर संस्था आयबीच्या आदेशावरून झाली होती.Yasin Malik
दावे… वाजपेयींच्या काळात पासपोर्ट मिळाला; मनमोहन सिंगांनी आभार मानले
१९९० च्या प्रारंभी मला तुरुंगातून दिल्लीला आणण्यात आले. गृहराज्यमंत्री राजेश पायलट यांना भेटलो. १९९४ मध्ये माझी सुटका आणि युद्धबंदी झाली.Yasin Malik
२००० च्या सुरुवातीला सरकार-प्रायोजित बॅक-चॅनल उपक्रमाचा भाग म्हणून मला मध्यस्थाद्वारे फोनद्वारे धीरूभाई अंबानींशी बोलण्याची व्यवस्था करण्यात आली.
२००१ मध्ये मला पहिल्यांदाच वाजपेयी, अडवाणींनी पासपोर्ट दिला. मी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि पाकला जाऊन ‘लोकशाही संघर्ष’ साठी वकिली केली. या काळात मी एनएसए ब्रजेश मिश्रा आणि आरके मिश्रा यांनाही भेटलो.२००६ मध्ये आयबीचे विशेष संचालक व्हीके जोशींच्या सांगण्यावरून मी पाकमध्ये दहशतवादी हाफिज सईदला भेटलो. त्यानंतर मनमोहन सिंगांनी ‘संयम आणि प्रयत्नांबद्दल’ माझे आभार मानले. या वेळी गृहमंत्री शिवराज पाटील उपस्थित होते.
कराची यात्रेवर उत्तर द्या : काँग्रेस
आरएसएस, भाजपशी संबंधित थिंक टँक यासीनला का भेटले? वाजपेयींचे हुरियत नेत्यांसोबतचे फोटो, अडवाणींची जिनांच्या दर्ग्याला भेट यावर भाजपने उत्तर द्यावे. -पवन खेडा, प्रवक्ता, काँग्रेस
अतिरेक्याला मंच दिला : भाजप
यासीन मलिक एक कुख्यात अतिरेकी आहे. त्याच्या कबुलीनाम्यातून काँग्रेस-यूपीएचा भयंकर चेहरा समोर आला. यूपीएने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली. – अमित मालवीय, भाजप
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचा ‘व्होट चोरी’ बॉम्ब फुसका, आरोप निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच उघडे
- सहा वर्षांत एकही निवडणूक नाही! 474 पक्षांचा ‘गेम ओव्हर’
- सध्या भारतात “दुबळे” पंतप्रधान; तर मग यासीन मलिकला हाफिज सईदच्या भेटीला पाकिस्तानात पाठवणारे पंतप्रधान “बळकट” होते का??
- BAPS organization : अमेरिकेतील BAPS संस्थेविरुद्धचा तपास बंद; न्यू जर्सी मंदिर प्रशासनावर कामगारांचे शोषण- मानवी तस्करीचा होता आरोप