• Download App
    Yadav family fued widen as tejasvi becomes executive president बिहार मधल्या मोठ्या पराभवानंतर तेजस्वीला कार्याध्यक्ष पदाची "बक्षीसी"; यादव कुटुंबातली फूट जास्त रुंदावली!!

    बिहार मधल्या मोठ्या पराभवानंतर तेजस्वीला कार्याध्यक्ष पदाची “बक्षीसी”; यादव कुटुंबातली फूट जास्त रुंदावली!!

    Yadav family

    नाशिक : निवडणुकीत कितीही मोठा पराभव होऊ द्या, सगळे कुटुंब तुटू द्या, तरी आम्ही नाहीच सुधारणार, याचा प्रत्यय आज देशाला आला. देशातल्या एका मोठ्या प्रादेशिक पक्षाने आज आपला कार्यकारी अध्यक्ष नेमला. लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकारी अध्यक्ष केले. पण तेजस्वी यादव यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची बक्षीसी दिल्यानंतर यादव कुटुंबातली फूट जास्त रुंदावली.Yadav family fued widen as tejasvi becomes executive president

    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा दणकून पराभव झाला. त्या निवडणुकीत त्या पक्षाचे नेतृत्व तेजस्वी यादव यांनी केले होते. पण तेजस्वी यादव यांचे कुठलेच “तेज” त्या निवडणुकीत पडले नव्हते. त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाला पराभवाला सामोरे जावे लागले. पण पक्षाची वाटचाल पराभवापर्यंतच येऊन थांबली नाही. त्यापलीकडे जाऊन लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब सुद्धा तुटले. तेजस्वी यादव, तेजा प्रताप यादव, रोहिणी आचार्य, मिसा भारती ही लालूंची सगळी मुले एकमेकांपासून दूर गेली. एकमेकांची वैरी बनली. लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब तुटल्याच्या बातम्या राष्ट्रीय पातळीवर गाजल्या.



    – कौटुंबिक डागडुजी नाही

    पण त्यानंतर पक्षीय पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर मोठी डागडुजी करण्याऐवजी लालूप्रसाद यादव यांनी फक्त तेजस्वी यादव यांची बाजू उचलून धरणे पसंत केले. त्यांचे स्वतःची तब्येत बिघडल्यानंतर त्यांनी बिहार मधल्या राष्ट्रीय जनता दलाची सूत्रे संपूर्ण कुटुंबाकडे न ठेवता फक्त तेजस्वी यादव यांच्याकडे सोपविण्याचे ठरविले. म्हणूनच त्यांनी आज तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.

    – तेजस्वी यादवांकडे सूत्रे

    लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आणि बिहार प्रदेश कार्यकारणीची बैठक बोलावली होती. तिच्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय होणार, अशा अटकळी सगळ्यांनी बांधल्या होत्या. लालूप्रसाद यादव स्वतः अध्यक्षपदावरून बाजूला होऊन तेजस्वी यादव यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची सूत्रे सोपवतील, असे अनेकांना वाटले होते. त्यानुसार राष्ट्रीय जनता दलाच्या सर्व नेत्यांनी तेजस्वी यादव यांचेच नाव कार्यकारी अध्यक्ष पदासाठी सुचवले. या बैठकीला लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या भावंडांपैकी फक्त मिसा भारती हजर होत्या. तेजस्वी यादव यांच्या कार्यकारी अध्यक्ष पदाचा प्रस्ताव भोला यादव यांनी मांडला. त्या प्रस्तावाला बिहार प्रदेश अध्यक्ष मंगनीलाल मंडल यांनी दुजोरा दिला. त्यानंतर सगळ्यांनी हात वर करून तेजस्वी यादव यांचे नेतृत्व मान्य केले.

    – भाजपकडून काही शिकलेच नाहीत

    बिहार विधानसभा निवडणुकांच्या मोठ्या पराभवानंतर आणि सगळे कुटुंब तुटल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची बक्षीस दिली. एकीकडे भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नियुक्ती करून भाजपमध्येच पिढी अंतर्गत बदलाला सुरुवात केली. पक्षामध्ये जुन्या नेत्यांना बाजूला करून नवीन नेत्यांना संधी निर्माण करून दिली. पण त्यातून काही शिकण्याच्या ऐवजी लालूप्रसाद यादव यांनी आपल्या घराणेशाहीचे नेतृत्व पुढे नेत तेजस्वी यादव यांच्याचकडे जबाबदारी सोपवली. बिहार सह देशातली राजकीय परिस्थिती कितीही बदलली, नव्या आणि तरुण रक्ताला वाव देण्याची गरज आणि संधी निर्माण झाली, तरी आम्ही सुधारणार नाही, हेच लालूप्रसाद यादव यांनी आजच्या राजकीय कृतीतून दाखवून दिले.

    – रोहिणी आचार्य यांचे टीकास्त्र

    लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी लालूप्रसाद यादव यांच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले. बिहार मधल्या राजकारणातल्या शिखर पुरुषाची कारकीर्द संपली. त्याच्या जागी कठपुतली शहजादाची ताचपोशी झाली, असे रोहिणी आचार्य यांनी आपल्या ट्विटर हँडल वर लिहिले. त्यामुळे लालूप्रसाद यांच्या निर्णयानंतर यादव कुटुंबातली दरी जास्तच रुंद झाल्याचे चित्र सगळ्या देशभर दिसले.

    Yadav family fued widen as tejasvi becomes executive president

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बंगाल SIR, EC ने गडबड असलेली नावे सार्वजनिक केली; पंचायत-ब्लॉक कार्यालयात यादी चिकटवली जाईल

    न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया म्हणाले – न्यायाधीशांची बदली न्यायपालिकेची अंतर्गत बाब, सरकारच्या विरोधात निकाल दिल्यास बदली योग्य नाही

    बिहार मधल्या मोठ्या पराभवानंतर आणि कुटुंब तुटल्यानंतरही तेजस्वी यादवांना “बक्षीसी”; राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष झाले कार्यकारी!!