विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तेलंगणा मधला आपला प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणाऱ्या वाय. एस. शर्मिला रेड्डी यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, तर निवर्तमान प्रदेशाध्यक्ष रुद्र राजू यांनी शांतपणे पद सोडल्याबद्दल त्यांची काँग्रेस कार्यकारिणीच्या निमंत्रक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.Y. S. Sharmila Reddy as state president of Andhra Congress; Giddiu Rudra Raju as Special Convener of Congress Executive for quietly resigning!!
उत्तर भारताल्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये प्रचंड गळती लागली असताना तेलंगण आणि आंध्रामध्ये काँग्रेसला फायदा झाला. तेलंगणात पक्षाची सत्ता आली, तर ती सत्ता आल्याबरोबर काँग्रेसचे दिग्गज नेते आणि अखंड आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या वाय. एस. शर्मिला यांनी आपला प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. या विलीनीकरणाची बक्षिसी त्यांना महिनाभराच्या आतच मिळाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची नियुक्ती आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी करून त्यांचा त्यांच्या भावाविरुद्ध म्हणजेच मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्याविरुद्ध लढाई करण्याचा मार्ग प्रशस्त केला.
त्याचवेळी वाय. एस. शर्मिला यांच्यासाठी आपल्या हातातले प्रदेशाध्यक्ष पद निमुटपणे सोडणारे गिड्डीऊ रुद्र राजू यांना देखील त्यांनी पद शांतपणे सोडले म्हणून त्यांची नियुक्ती काँग्रेस कार्यकारणीवर विशेष निमंत्रक म्हणून करण्यात आली. एरवी काँग्रेसमध्ये कुठलाही नेता कोणतेही पद सहजासहजी सोडायला तयार होत नाही. पण गिड्डीऊ रुद्र राजू यांनी काँग्रेस हायकमांडचा आदेश येताच प्रदेशाध्यक्ष पद सोडले म्हणून त्यांना बढती देऊन काँग्रेस कार्यकारिणी मध्ये विशेष निमंत्रकपदी नेमले आहे.
Y. S. Sharmila Reddy as state president of Andhra Congress; Giddiu Rudra Raju as Special Convener of Congress Executive for quietly resigning!!
महत्वाच्या बातम्या
- मोदींना हरवायला राहुल गांधी – रश्मी ठाकरेंच्या यात्रा; पण आपल्याच नेत्यांना पक्षांत रोखून धरता येईना!!
- लोकसभेसाठी मायावतींचे एकला चलो रे, इंडिया आघाडीचा फायदा कमी, नुकसान जास्त असल्याची टीका
- मोदी सरकारच्या नऊ वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर!
- काँग्रेस हायकमांडच्या राम विरोधी निर्णयाचा उत्तर प्रदेश काँग्रेस नेत्यांना फटका; अयोध्येत धक्काबुक्की करून जनतेने दिला झटका!!