वृत्तसंस्था
लखनऊ : अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा दिली आहे. इलियासी यांनी २२ सप्टेंबर रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीत त्यांना राष्ट्रपिता संबोधले होते. यानंतर त्यांना जिवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळत आहेत.Y Plus security for Ilyasi: Death threats received; The leader of the Union was called the father of the nation
भागवत आणि आरएसएसच्या अन्य ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत एका मशिदीत इलियासींशी एक तास चर्चा केली होती. इलियासी यांनी सांगितले की, ‘मला इंग्लंड, दुबई आणि कोलकात्यातून फोनवर धमक्या मिळत होत्या. त्यानंतर मी टिळक लेन ठाण्यात तक्रार दिली. तसेच गृह मंत्रालयालाही माहिती दिली.
मोहन भागवत जेव्हा आमच्या मशिदीत आले तेव्हापासून सतत धमक्यांचे फोन येत आहेत. मला २३ सप्टेंबरला इंग्लंडहून धमकीचा फोन आला. त्यात तुम्ही आता नरकाच्या आगीत जळाल, तुम्ही जिवंत राहणार नाही, असे म्हटले होते. काही कट्टरपंथीयांना देशात शांतता किंवा प्रेम आवडत नाही, असे हे असे लोक आहेत. मी धमक्यांपुढे झुकणार नाही आणि वक्तव्यही मागे घेणार नाही.’
Y Plus security for Ilyasi: Death threats received; The leader of the Union was called the father of the nation
महत्वाच्या बातम्या
- परमबीर सिंहांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट : अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप करून आले होते चर्चेत, चर्चांना उधाण
- मॉस्कोहून येणाऱ्या विमानात बॉम्बची माहिती मिळाल्याने खळबळ : दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरले प्रवासी
- भुजबळांच्या अमृत महोत्सवी सत्कारात अजितदादांचे भाषण : पवारांचे पंतप्रधानपद, भुजबळांचे मुख्यमंत्रीपद आणि नशीब!!
- ममतांची धमकी : भाजपची सत्ता गेल्यावर केंद्रीय तपास संस्था त्यांच्या नेत्यांना कान धरून घराबाहेर काढतील