नाशिक : तामिळनाडू आणि बंगालमध्ये तुफानी मतदान; क्या तुमने बारामती आणि राहुरी मतदारांची मतदानाकडे पाठ!!, हेच राजकीय चित्र आज सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर समोर आले.World record turnout in Tamil Nadu and Bengal; in comparison, voters in Baramati and Rahuri turned their backs on voting!!
तामिळनाडू आणि बंगालमध्ये ८० % वर मतदान
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मतदारांनी प्रचंड मतदान करून आपला कौल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये बंद केला. या दोन्ही राज्यांमध्ये सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ८० % पेक्षा जास्त मतदान नोंदले गेले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तामिळनाडूमध्ये ८२.२४ %, तर पश्चिम बंगाल मध्ये ८९.९३ % मतदान नोंदले गेले. याचा अर्थ गेल्या 75 वर्षांमधला हा नवीन विक्रम तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांनी तयार केला. आतापर्यंत कुठल्याच मोठ्या राज्यांमध्ये मतदानाचे प्रमाण ८० % पेक्षा जास्त पुढे गेल्याचे आढळले नव्हते. पण २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल मधल्या मतदारांनी मात्र प्रचंड मतदान करून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
– बारामती मतदारांची पाठ
मात्र एकीकडे तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल मधल्या मतदारांनी तुफानी मतदान करून लोकशाहीचा जागर मांडला असला तरी दुसरीकडे बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे मतदारांनी त्या तुलनेत पाठ फिरवल्याचे दिसले. बारामती मध्ये सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणायचा चंग सगळ्या पवार कुटुंबीयांनी बांधला. त्यासाठी अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे राजकीय कार्ड वापरले तरीसुद्धा बारामतीत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत फक्त ५२.४५ % मतदान नोंदले गेले होते, तर राहुरी मतदारसंघात त्याहीपेक्षा कमी म्हणजे ५०.६८ % मतदान नोंदले गेले होते.
– बारामतीत विक्रमी मताधिक्य दूरच
त्यामुळे अर्थातच तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातला मतदार हा फारच मागे पडल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. पण त्याही पलीकडे जाऊन सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडून आणायचा चंग पवार कुटुंबीयांनी बांधला होता, त्यावर बारामतीच्या मतदारांनी पाणी फेरल्याचेच दिसून आले. कारण बारामतीत फक्त ५२.४४ % एवढेच मतदान नोंदले गेले. त्यामुळे आता सुनेत्रा पवार झालेल्या मतदानातून फार मोठ्या फरकाने निवडून जरी आल्या, तरी त्यातून विक्रमी मताधिक्याची शक्यता फार कमी आहे.
World record turnout in Tamil Nadu and Bengal; in comparison, voters in Baramati and Rahuri turned their backs on voting!!
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक रंगात आल्याबरोबर मोदींना शिव्या; मल्लिकार्जुन खर्गेंनी पुढे चालविली काँग्रेसी पराभवाची परंपरा!!
- UN : UN दूत म्हणाल्या-भारताने इस्रायलला मदत करून कायदा मोडला; शस्त्र पाठवणे नियमांच्या विरोधात
- Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- विज्ञान आणि धर्म या दोन्हीतून शांती मिळाली नाही; राजापासून विज्ञानापर्यंत सर्व मॉडेल्स अयशस्वी
- ममता बॅनर्जींनी कितीही जोर लावू द्या, आम्ही बंगालमध्ये बाबरी मशीद बांधू देणार नाही; अमित शाहांचा