• Download App
    World Championship : अंशु मलिकने रचला इतिहास, भारताला मिळाले रौप्य पदक,अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पैलवानWorld Championship: Anshu Malik makes history, India wins silver, first Indian woman wrestler to reach final

    World Championship : अंशु मलिकने रचला इतिहास, भारताला मिळाले रौप्य पदक,अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पैलवान

    युरोपच्या सोलोमिया विनिकला पराभूत करून अंशूने स्पर्धेच्या फायनल्समध्ये प्रवेश केला होता. आजच्या सामन्यात अंशूने अमेरिकेच्या हेलन मारोलिसशी दोन हात केले.World Championship: Anshu Malik makes history, India wins silver, first Indian woman wrestler to reach final


    विशेष प्रतिनिधी

    ओस्लो ( नॉर्वे ) : भारतीय महिला कुस्तीपटू अंशू मलिकने नॉर्वेच्या ओस्ले येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.



    युरोपच्या सोलोमिया विनिकला पराभूत करून अंशूने स्पर्धेच्या फायनल्समध्ये प्रवेश केला होता. आजच्या सामन्यात अंशूने अमेरिकेच्या हेलन मारोलिसशी दोन हात केले. पण तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हेलन मारोलिसने ५७ किलो वजनी गटात विश्वविजेतेपद पटकावले.

    जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या १९ वर्षीय अंशूने आक्रमक सुरुवात करताना १-० अशी आघाडी घेतली. परंतु त्यानंतर सामन्याने नाट्यमय कलाटणी प्राप्त केली आणि मॅरोलिसने अंशूच्या खांद्याची पकड घेत तिला जमिनीवर आदळत २-१ अशी आघाडी घेतली.

    मग मॅरोलिसने अंशूची पाठ टेकवत चीतपट केले आणि ४-१ अशा फरकाने विजय मिळवला. मॅरोलिसची पकड इतकी घट्टी होती की, सामना संपल्यानंतर अंशूसाठी त्वरित वैद्यकीय साहाय्य घ्यावे लागले. सुवर्णपदक हुकल्यामुळे तिला अश्रू आवरणे कठीण गेले.

    World Championship: Anshu Malik makes history, India wins silver, first Indian woman wrestler to reach final

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले