विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या महिलांनी आई कधी व्हावं, याचा निर्णय खूप काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. कारण, त्याचा त्यांच्या करिअरवर परिणाम होतो, असा सल्ला माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी दिला.Working women should carefully decide when to become a mother, advises Kiran Bedi
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वुमन पॉवर, ए ग्लोबल मूव्हमेंट या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना, समाजाने विशेषत: पालकांनी आणि शाळांनी मुलींना नेतृत्वगुण शिकवणाºया खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन बेदी यांनी केले. यावेळी त्यांनी मुलींना शिक्षण घेताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते,
कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागते, याबद्दल आपले अनुभव शेअर केले.तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याशिवाय किंवा कोणी गृहिणी म्हणून निवडल्याशिवाय तुम्ही लग्न करू नये, असे आवाहन बेदी यांनी केला. नोकरी करणाऱ्या महिलांनी आई केव्हा व्हायचे, याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. कारण इतर कोणीही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
Working women should carefully decide when to become a mother, advises Kiran Bedi
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात मेट्रोचे उद्घाटनही झाले, पण मुंबईत बेबी पेंग्विन अजून जागा शोधताहेत, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- पिंपरीत देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांवर राष्ट्रवादीची चप्पलफेक, नितेश राणेंचा राष्ट्रवादीला जशास तसेचा इशारा
- तीन वर्षांत २,१६० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
- श्रीनगरमध्ये ग्रेनेडच्या स्फोटात एका पोलीस कर्मचाऱ्यासह 20 जण जखमी