प्रतिनिधी
मुंबई : नवरात्रोत्सवानिमित्त शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक खास अभियान जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. Women’s health special campaign in Maharashtra on the occasion of Navratri
सोमवारपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान आयोजित केले आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान, चालणा-या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरुक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी, असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्यक तपासणी करुन घ्यावी, अशी विनंती आपल्याला करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
महिलांनी लाभ घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभरात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 2 या वेळेत 18 वर्षांवरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे नवीन बॅंक खाते उघडणे, गरोदर मातांचे आधार कार्ड जोडणे यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
Women’s health special campaign in Maharashtra on the occasion of Navratri
महत्वाच्या बातम्या
- मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिस आज पतियाळा हाऊस कोर्टात हजर होणार, 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी, कोर्टाने पाठवले समन्स
- ‘आधी राजस्थान काँग्रेस जोडा, नंतर भारत’, आमदारांच्या सामूहिक राजीनाम्याचा भाजपची टीका
- राजस्थानात राजकीय भूकंप : गेहलोत समर्थक 90 आमदारांचा राजीनामा, मुख्यमंत्रिपदासाठी पायलट यांना विरोध
- राजस्थानातील पेचप्रसंगाच्या निमित्ताने प्रश्न; अशोक गहलोत काँग्रेसचे सर्वसमावेशक अध्यक्ष बनू शकतील??