नड्डा यांची प्रचारसभा संपताच लोकांनी होर्डिंग्स उतरवले आणि आपल्यासोबत घेऊन गेले.यावेळी सिलेंडर महाग झाला असल्याने ही होर्डिंगची लाकडं चूल पेटवण्याच्या कामी येतील असं ते सांगत होते.Women tear down hoardings after JP Nadda’s campaign rally; Said – will come to work to light the stove in the house
विशेष प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : गेल्या काही महिन्यांत सिलिंडरचे भाव चांगलेच वाढत चालले आहेत.त्यातही सबसिडीही जवळपास बंदच झाली आहे. सिलिंडर विकत घ्यायचा की, घरात किराणा भरायचा, असा प्रश्न लोकांसमोर उभा राहत आहे.दरम्यान घरगुती सिलेंडर महाग झाल्याचा प्रभाव आता भाजपाच्या प्रचारसंभांमध्येही दिसू लागला आहे.मंगळवारी (२८ डिसेंबर ) उत्तर प्रदेशातील हापुड येथे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी भाजपा नेत्यांनी लाखो रुपये खर्च करुन तिथे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते.
दरम्यान नड्डा यांची प्रचारसभा संपताच लोकांनी होर्डिंग्स उतरवले आणि आपल्यासोबत घेऊन गेले.यावेळी सिलेंडर महाग झाला असल्याने ही होर्डिंगची लाकडं चूल पेटवण्याच्या कामी येतील असं ते सांगत होते.
तेथील एका महिलेला हा सगळा प्रकार विचारला असता तिने सांगितलं की, “आम्ही मजूर आहोत.भाड्याच्या घरात आम्ही राहतो. सिलेंडर १००० रुपये महाग असल्याने तो परवडत नाही”. सिलेंडर परवडत नसल्याने किमान ही लाकडं वापरत जेवण तरी बनवू असं सांगत या महिलांने त्यांची परिस्थिती व्यक्त केली.
Women tear down hoardings after JP Nadda’s campaign rally; Said – will come to work to light the stove in the house
- Ludhiana Blast : जर्मनीतून अटक करण्यात आलेल्या जसविंदरचा खुलासा, पाकिस्ताननेच पंजाब निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचाराचा कट रचला
- अमरावतीत खळबळ , प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- Anil Deshmukh Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने केले मुख्य आरोपी, ७००० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल
- खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉझिटिव्ह, पती सदानंद सुळे यांनाही लागण