• Download App
    ममतांपुढे माघार घेत विरोध ऐक्यासाठी पवारांनी पंतप्रधान पदावरचा दावा सोडलाय का??; राजकीय वर्तुळात चर्चा Withdrawing from Mamata, did Pawar abandon his claim for the post of Prime Minister?

    ममतांपुढे माघार घेत विरोध ऐक्यासाठी पवारांनी पंतप्रधान पदावरचा दावा सोडलाय का??; राजकीय वर्तुळात चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असे काल राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. त्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून शरद पवार यांनी पंतप्रधान पदावरचा आपला दावा खरंच सोडला आहे का? सोडला असल्यास तो विरोधी ऐक्यासाठी सोडला आहे का? या मुद्द्यावर जोरदार खल सुरू झाला आहे. Withdrawing from Mamata, did Pawar abandon his claim for the post of Prime Minister?

    शरद पवार हे सर्व विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. हे स्वतः देखील त्यांनी स्पष्ट केले आहे, असे नवाब मलिक म्हणाले. परंतु शरद पवार आणि पंतप्रधान पद ही गेल्या 30 वर्षांमधली मोठी राजकीय कहाणी असून त्यामध्ये अनेक वेळा खुद्द पवारांनी “हो – नाही” अशी भूमिका घेतली आहे. अनेकदा त्यांच्या समर्थकांनी परस्पर विरोधी विधाने देखील केली आहेत. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उघडपणे पंतप्रधान शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांच्या उपस्थितीतच केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे पानिपत झाले. त्यामुळे पवारांचा पंतप्रधान बनवण्याचा प्रश्नच उरला नाही.


    मोठी बातमी : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत शरद पवारांनी समाजवादी पक्षासोबत युती केली जाहीर, म्हणाले- यावेळी परिवर्तन होणारच!


    परंतु, आता पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी राष्ट्रीय पातळीवर ऍक्टिव्ह झाल्यानंतर पवारांच्या पंतप्रधानपदाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील की शरद पवार यावर संघर्ष उदभवू शकतो. हा संघर्ष टाळण्यासाठी आणि सर्व विरोधकांचे खऱ्या अर्थाने ऐक्य करण्यासाठी पवारांनी आपला पंतप्रधानपदावर साधावा सोडला आहे का? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या म्हणण्यानुसार शरद पवारांनी सध्या जरी आपला पंतप्रधान पदावरचा दावा सोडला असला तरी आतापर्यंतचा त्यांच्या राजकारणाचा अनुभव लक्षात घेतला तर त्यांची हीच भूमिका कायम राहील का?, अशी शंका देखील राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

    Withdrawing from Mamata, did Pawar abandon his claim for the post of Prime Minister?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Umar Suicide : दहशतवादी डॉ. उमर आत्मघाती बॉम्बर तयार करत होता; 11 तरुणांच्या ब्रेनवॉशसाठी 70 व्हिडिओ पाठवले

    2026 पर्यंत बद्रीनाथ स्मार्ट आध्यात्मिक शहर बनणार; ₹481 कोटी खर्च, PMO करत आहे मॉनिटरिंग

    सुप्रीम कोर्टाने म्हटले- दिल्लीतील शाळांत क्रीडा कार्यक्रम नको, मुलांना गॅस चेंबरमध्ये टाकण्याच्या मुद्द्यावर आदेश जारी