विशेष प्रतिनिधी
लखनौ : काँग्रेसने मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते संतापाने लाले लाल झाले आहेत आणि राहुल गांधींना पागल मंद बुद्धी ठरवून त्यांनी इंडिया आघाडीची लक्तरे काढली आहेत.With the help of the crazy slow-witted Rahul Gandhi…!!; Samajwadi leader removed the “India” front!!
याची कहाणी अशी :
मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाने काँग्रेसकडे 6 विधानसभा जागांची मागणी केली होती. पण काँग्रेसने त्यांना एकही जागा दिली नाही आणि परस्पर आपले उमेदवार जाहीर करून टाकले. त्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव चिडले आणि त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर शरसंधान साधले, पण त्या पलीकडे जाऊन समाजवादी पक्षाचे बाकीचे नेते जास्त चवताळले आणि त्यांनी राहुल गांधींना पागल आणि मंदबुद्धी ठरवून मोठे मोकळे झाले.
समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवर काँग्रेसच्या दिशेने जोरदार राजकीय गोळीबार केला.
आय. पी. सिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणतात :
नेताजी म्हणजे मुलायम सिंह यादव तेव्हाच म्हणाले होते की, काँग्रेसच आपला शत्रू नंबर 1 आहे. आपण स्वतःच्या बळावर भाजपला हरवू शकतो. आपण काँग्रेसच्या नादी लागायचे काहीच कारण नाही, असे नेताजी म्हणाले होते. आज काँग्रेसच्या पागल मंद बुद्धी राहुल गांधींनी त्यांच्या वर्तणुकीतून हे सिद्धच केले की नेताजी म्हणाले ते बरोबर होते.
महागठबंधनच्या माध्यमातून नितीश कुमार यांनी आठ वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद यशस्वीरीत्या सांभाळले. त्यांच्यासारख्या साध्या सज्जन नेत्याला संपूर्ण महागठबंधनचा नेता बनवायचे सोडून काँग्रेस आज त्यांना त्रास देत आहे. 2019 मध्ये चौकीदार चोर है, अशी घोषणा देऊन पागल मंदबुद्धी राहुल गांधींच्या बळावर काँग्रेस एकटी निवडणुकीत उतरली आणि हरली. आजही काँग्रेसला स्वतःच्या बळावर मोदींना हरवणे शक्य नाही. जो व्यक्ती स्वतःचा भाऊ वरुण गांधीला आपल्याबरोबर जोडून घेऊ शकला नाही, तो नेता खोटी मोहब्बत वाटत फिरत आहे. काँग्रेसच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी समाजवादी पक्षाचे ते काही बिघडवू शकत नाहीत. राहुल गांधी तसेही निर्वंश होणार आहेत होणार आहेत, त्यांच्यासाठी त्यांचे आजोळच “सुरक्षित” जागा आहे.
INDIA आघाडीची सूत्रे खरे तर ज्येष्ठ आणि गंभीर नेत्यांकडे दिली पाहिजे काँग्रेस मधल्या हलक्या नेत्यांच्या तोंडाळपणाचा फायदा भाजपला होत आहे समाजवादी पक्ष कम संयम राखतो पण ती आमची कमजोरी नाही.
श्रद्धेय नेताजी मुलायम सिंह यादव काँग्रेसला दुश्मन नंबर 1 म्हणायचे. काँग्रेसचे नेते आपल्या आचरणातून तेच वारंवार सिद्ध करत आहेत 2004 ते 2014 या काळात काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या सहयोगी पक्षांबरोबर दुर्व्यवहारच केला 2004 मध्ये नेताजींनी उत्तर प्रदेशात 39 जागा जिंकून आणले भाजपला फक्त 8 जागा मिळाल्या, त्यामुळे भाजप सत्तेतून बाहेर गेला. त्यानंतर तब्बल 10 वर्षे भाजप उभा राहू शकला नाही.
पण 2004 मध्ये काँग्रेस सत्तेवर येतात त्या पक्षाच्या नेत्यांनी नेताजी म्हणजे मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव यांचा छळ सुरू केला. राहुल गांधींच्या नादानीमुळेच लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांना एवढा त्रास झाला की त्यांची किडनी खराब होऊन त्यांना आज जीवन मरणाचा झगडा करावा लागत आहे.
राहुल गांधींच्या पदयात्रेने उत्तर भारतात कोणताही फरक पडणार नाही. आज काँग्रेस जातनिहाय जनगणनेचा मुद्दा भाजप विरोधात वापरू इच्छित आहे, पण याच काँग्रेसने जातनिहाय जनगणनेला भाजपच्या बरोबरीनेच पुढे येऊन विरोध केला होता हे जनता विसरलेली नाही.
मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या अडवणुकीच्या वर्तणुकीमुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीची अशी लक्तरे निघाली आहेत.
With the help of the crazy slow-witted Rahul Gandhi…!!; Samajwadi leader removed the “India” front!!
महत्वाच्या बातम्या
- “आम्ही पुन्हा इतिहास रचला आहे…”, गगनयान मिशनच्या क्रू मॉड्यूलच्या यशस्वी प्रक्षेपणावर इस्रो प्रमुखांचं विधान!
- Israel Hamas War : हमासने दोन अमेरिकन ओलिसांची सुटका केली, ब्लिंकन यांनी मध्यस्थीसाठी मानले कतारचे आभार
- कंत्राटी भरतीचे जंजाळ; पण ज्यांनी सुरू केली, तेच करताहेत आज बवाल!!
- डाबरच्या हेअर रिलॅक्सरमुळे कॅन्सरच्या दाव्याने खळबळ; अमेरिकेच्या फेडरल कोर्टात तब्बल 5,400 खटले दाखल, कंपनीचे शेअर्स घसरले