• Download App
    अभिमानास्पद! भारताच्या मदतीने तब्बल ४० लाख श्रीलंकन मुलांचे शिक्षणाचे स्वप्न होत आहे पूर्णWith the help of India about 4 million Sri Lankan childrens dream of education is coming true

    अभिमानास्पद! भारताच्या मदतीने तब्बल ४० लाख श्रीलंकन मुलांचे शिक्षणाचे स्वप्न होत आहे पूर्ण

    (Image Courtesy: Twitter/@IndiainSL)

    जाणून घ्या कसे? आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला भरघोस मदत केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भारताने दिलेल्या कर्ज मदतीपैकी एक कोटी डॉलर हे तेथील विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या छपाईसाठी वापरले गेले आहेत. यातून सुमारे ४० लाख विद्यार्थ्यांसाठी पुस्तके छापली जात आहेत. भारताने गेल्या वर्षी श्रीलंकेला १०० दशलक्ष डॉलर्सची कर्ज मदत जाहीर केली होती. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी शनिवारी ही माहिती दिली.  With the help of India about 4 million Sri Lankan childrens dream of education is coming true

    भारतीय उच्चायुक्तांच्या म्हणण्यानुसार, भारताने मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेला अन्न, इंधन, औषधे आणि औद्योगिक कच्चा माल यासह अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी १०० दशलक्ष डॉलर कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या रकमेपैकी श्रीलंका सरकार आणि खासगी आयातदारांनी भारतातून पुस्तकांच्या छपाईसाठी कागदासह साहित्य खरेदी केले, ज्यासाठी एक कोटी अमेरिकन डॉलर वापरले गेले आहेत. एबीपी न्यूजने हे वृत्त दिले आहे.


    लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावरील कारवाईमुळे नितीश कुमार सर्वाधिक खूश : सुशील मोदी


    भारताने दिलेल्या मदतीतून शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये श्रीलंकेतील ४० लाख मुलांची ४५ टक्के पुस्तके छापण्याचे काम केले जात असल्याची माहिती उच्चायुक्तांनी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आतापर्यंत श्रीलंकेला जीवनावश्यक वस्तू, पेट्रोलियम, खते, रेल्वेचा विकास, पायाभूत सुविधा, संरक्षण क्षेत्र आणि अक्षय ऊर्जा यासह अनेक क्षेत्रात चार अब्ज अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त कर्ज मदत देण्यात आली आहे.”

    याबाबतचे ट्विटही उच्चायुक्तांनी केले होते. श्रीलंकेतील मुलांच्या भविष्यासाठी भारत मदत करत असल्याचे त्यात म्हटले आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेत आर्थिक अडचणींमुळे अराजकतेचे वातावरण होते. राष्ट्रपती भवन आणि सरकारी कार्यालयांमध्ये लोकांनी तळ ठोकला होता. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडून पळून जावे लागले होते.

    With the help of India about 4 million Sri Lankan childrens dream of education is coming true

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव