• Download App
    ऑनलाईन फूड ऑर्डर करणे महाग होणार? स्वीगी झोमॅटोला द्यावा लागणार 5% जीएसटी? Will ordering food online be expensive? Swiggy Zomato will have to pay 5% GST

    ऑनलाईन फूड ऑर्डर करणे महाग होणार? स्वीगी झोमॅटोला द्यावा लागणार 5% जीएसटी?

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : ऑनलाईन फूड ऑर्डर करणे ही आजकालची फॅशन आहे. आपल्यापैकी बरेचजण ऑनलाईन फूड ऑर्डर करत असतात. तर नुकताच सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या झोमॅटो, स्विगी यासारख्या कंपन्यांना सरकारला 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करणे महाग होईल का? तर याचे उत्तर आहे, नाही. Will ordering food online be expensive? Swiggy Zomato will have to pay 5% GST



    जेव्हा तुम्ही स्विगी आणि झोमॅटो या ॲप्स वरून जेवण ऑर्डर करता. त्यावेळी हे ॲप्स तुमच्याकडून gst घेतात. सरकारला डायरेक्ट हे ॲप्स हा gst देत नाहीत तर संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंट जीएसटी सरकार देत असतात. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू करण्यात येणार आहे.

    पण आता नुकताच घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित ॲप्सना डायरेक्ट सरकारला जीएसटी द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे कमिशन म्हणून या हॉटेल्स कडून जी किंमत हे ॲप्स घेतात, त्यावर 18 टक्के कर देखील सरकारला द्यावा लागणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच ही घोषणा केली आहे.

    Will ordering food online be expensive? Swiggy Zomato will have to pay 5% GST

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!