• Download App
    तेलंगणात केसीआर मुलाकडे सत्ता सोपवून देशात झेप घेणार होते, पण जनतेने घरी बसवले, हा इशारा महाराष्ट्रातल्या कोणाला??|Will not accept regional dynastic politics, strong msg from telangana voters, will sharad pawar learn the lesson??

    तेलंगणात केसीआर मुलाकडे सत्ता सोपवून देशात झेप घेणार होते, पण जनतेने घरी बसवले, हा इशारा महाराष्ट्रातल्या कोणाला??

    केसीआर + के. टी. रामा राव + शरद पवार + सुप्रिया सुळे

    तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपला मुलगा के. टी. रामा राव यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवून राष्ट्रीय राजकारणात झेप घेणार होते, पण जनतेने त्यांना घरी बसवले. यातला नेमका राजकीय इशारा महाराष्ट्रातल्या कोणाला मिळाला आहे??, असा सवाल तयार झाला आहे.Will not accept regional dynastic politics, strong msg from telangana voters, will sharad pawar learn the lesson??

    तेलंगणात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी के. चंद्रशेखर राव आणि भारत राष्ट्र समिती यांच्याविरुद्ध रान पेटवले होते, त्यातही हे रान पेटवण्यात भाजप आघाडीवर होता. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबाद मधल्या भाषणात चंद्रशेखर राव आपल्याकडे युती करण्यासाठी आले होते, पण जनतेशी प्रतारणा करायची नाही म्हणून भाजपने त्यांचा प्रस्ताव नाकारला, असे सांगून केसीआर यांनाच टार्गेट केले होते.



    भाजपला तिथे मोठे यश मिळण्याची अपेक्षा होती. पण मतदान संपल्यानंतर भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांमध्ये तेलंगणाच्या राजकीय ट्रेंड बद्दलची चर्चा झाली. त्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काही प्रमाणात खुलेपणाने दिली. तेलंगणातल्या भाजपच्या प्रचाराचा फायदा भाजप पेक्षा काँग्रेसला जास्त होईल, केसीआर यांची सत्ता जाईल हेच आमच्या अंतर्गत वर्तुळात बोलले गेले होते. कारण राज्यामध्ये भाजपची संघटना अजून पुरेशी मजबूत नाही, असे विनोद तावडे म्हणाले. याचा अर्थच तेलंगणातल्या निवडणुकीत भाजपच काँग्रेसची “बी टीम” ठरली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

     केसीआर यांची योजना

    पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेस आणि के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती यांच्यातली राजकीय लढत लक्षात घेतली, तर केसीआर यांनी स्वतःची एक योजना तयार केली होती. तेलंगणातली विधानसभा निवडणूक जिंकली की, राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे आपला मुलगा के. टी. रामा राव यांच्याकडे सोपवायची आणि आपण स्वतः राष्ट्रीय राजकारणात झेप घ्यायची ही त्यांची योजना होती. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम देखील सुरू केले होते.

    Telangana Exit Poll : तेलंगणात BRSला बसणार दणका, पाहा निकालाचे अंदाज

    मूळात भारत राष्ट्र समिती त्यांना राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी मोठा गाजावाजा करून दिल्लीत मोठे कार्यालय उघडले. महाराष्ट्रात त्यांनी “शेतकऱ्यांचे सरकार” अशी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठी पोस्टर लावली. महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाठीभेटी घेऊन विरोधी आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. केसीआर यांची ही राष्ट्रीय राजकारणाची दिशा त्यावेळी हळूहळू स्पष्ट होत होती. तेलंगण जिंकले की देशात फिरायचे आणि पंतप्रधान पदाच्या दृष्टीने प्रयत्न करत राहायचे हा त्यांचा राजकीय होरा होता. त्याचवेळी आपल्या मुलाकडे म्हणजे के. टी. रामा राव यांच्याकडे तेलंगणातील सूत्रे सोपवून आपला राजकीय पायाही मजबूत ठेवायचा असा त्यांचा मनसूबा होता. पण नेमका हाच मनसूबा तेलंगणातल्या जनतेने उद्ध्वस्त केला.

    तेलंगणातला तेलंगणातले काँग्रेसचे यश हे खऱ्या अर्थाने केसीआर यांचे अपयश आहे आणि काँग्रेसच्या याच्यात भाजपच्या प्रचाराचा जास्त वाटा आहे.

    पण त्या पलीकडे जाऊन केसीआर यांचा जो मनसूबा उद्ध्वस्त झाला, त्यातून महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याला जनतेचा इशारा मिळाला आहे?? हा कळीचा सवाल आहे.

    तेलंगणात केसीआर हे के. टी. राम राव या मुलाकडे सूत्र सोपवणार होते. महाराष्ट्रात शरद पवारही आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे सूत्रे सोपवू इच्छित आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजितदादांच्या नेतृत्वाखाली सत्तेच्या वळचणीला पाठवून द्यायचा आणि दुसरा गट विकसित करून तो सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवायचा. त्या गटाला राजकीय बळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने नवे मराठा नेतृत्व उभे करायचे या सगळ्या राजकीय खेळी शरद पवार एकाच वेळी खेळत आहेत. यातून त्यांची एकजातीय मराठा राजकारणाची जुनी शैली देखील पुन्हा एकदा उघड्यावर आली आहे. पण पवारांनी असा मनसूबा राखणे इतपत ठीक आहे, त्या पलीकडे जाऊन जनतेचा कौल मिळवून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहणे आणि तो सत्तेच्या दिशेने वाटचाल करणे या दोन भिन्न बाबी आहेत.

    के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात असाच प्रयत्न करून पाहिला. त्यात ते अयशस्वी ठरले. त्यांच्या मनसूब्यानुसार मुलाकडे सत्ता जाण्याऐवजी जनतेने ती सत्ता काँग्रेसकडे सोपविली… मग महाराष्ट्रात पुन्हा एकदा जुन्या शैलीने एकजातीय मराठा राजकारण करणाऱ्या शरद पवारांचा मनसूबा यशस्वी होईल का??, हा प्रश्न आहे. भले पवार आपली कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे आपल्या पक्षाची सर्व सूत्रे सोपवून सत्तेच्या दिशेने वाटचाल करू इच्छित असतीलही, पण जनता त्यांना विजयी करेल का??, हा कळीचा सवाल आहे. तेलंगणातल्या जनतेने दिलेला इशारा आणि त्यातला धडा पवार महाराष्ट्रात शिकतील का??, हा त्या पुढचा सवाल आहे!!

    Will not accept regional dynastic politics, strong msg from telangana voters, will sharad pawar learn the lesson??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ammar Yashar : झारखंडमध्ये पकडलेला दहशतवादी अम्मार याशर, ‘इंडियन मुजाहिदीन’नंतर HUT मध्ये होता सक्रिय

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Terrorist Pannu : पहलगाम हल्ल्यानंतर खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पुन्हा गरळ ओकली

    Icon News Hub