विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस मध्ये काल 29 सप्टेंबर 2022 रोजी बऱ्याच दिवसांनी मध्यरात्री पर्यंत राजकीय खलबते चालली. काँग्रेस केंद्र आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेवर असताना मध्यरात्री पर्यंत खलबते चालत असत. काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यानंतर अशा प्रकारची खलबते थांबली होती.Will Ashok Gehlot be a Congress presidential candidate of g23 group within the party??
पण राजस्थान एपिसोडनंतर आणि अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मध्यरात्रीची खलबते पुन्हा दिसून आली. दस्तुरखुद्द सोनिया गांधी बऱ्याच दिवसांनी 10 जनपथ बाहेर पडून प्रियांका गांधी वड्रा यांच्या घरी जाऊन खलबते करून आल्या.
पण यातले सगळ्यात महत्वाचे खलबत ठरले, ते राजधानी दिल्लीतल्या जयपूर हाऊसमधले.त्याचे झाले असे : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबरोबरच राजस्थान मधला नेतृत्वाचा पेचप्रसंग एपिसोड क्रमांक एक सलग दोन दिवस घडल्यानंतर काल खलबतांचा केंद्रबिंदू राजधानी दिल्ली राहिला होता. त्यातही मध्यरात्री काँग्रेसचे नेते एकमेकांकडे जाऊन चर्चा करत राहिले. यामध्ये दस्तूरखुद्द सोनिया गांधी सामील झाल्या होत्या. सचिन पायलट त्यांना रात्री 9.30 नंतर 10 जनपथ वर भेटून गेल्यानंतर सोनिया गांधी 10 जनपथ मधून बाहेर पडल्या आणि त्यांनी प्रियांका गांधी यांच्या घरी जाऊन रात्री 12.00 वाजेपर्यंत चर्चा केली. त्यानंतर तेथून त्या बाहेर पडल्या.
दरम्यानच्या काळात काल मध्यरात्रीपर्यंत जी 23 गटाचे नेते एकमेकांना भेटत होते. आनंद शर्मा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा आणि खासदार मनीष तिवारी यांनी चर्चा केली. त्यानंतर आनंद शर्मा हे जयपूर हाऊस मध्ये पोहोचले. तेथे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत उतरले आहेत. तेथे जाऊन आनंद शर्मा यांनी मध्यरात्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेतूनच संशय बळावला की कदाचित अशोक गहलोत आता जी 23 गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात!!
अशोक गहलोत जी 23 गटाचे उमेदवार??
राजस्थानात नेतृत्वाच्या पेचप्रसंगात अशोक गहलोत यांचा गट थेट काँग्रेस हायकमांडला आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यावर खुलासा करण्यासाठी अशोक गहलोत यांनी सायंकाळीच सोनिया गांधी यांची भेट घेऊन माफी देखील मागितली होती. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली होती. पण विषय इथेच थांबला नाही. गहलोत यांच्या या माघारी नंतर आनंद शर्मा यांनी जी 23 गटाच्या वतीने जाऊन अशोक गहलोत यांची भेट घेतली. याला विशेष राजकीय महत्त्व आहे. कारण अशोक गहलोत हे राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर पक्की मांड ठोकून बसलेले असताना त्यांनी कधीच जी 23 गटाच्या नेत्यांना भेट दिली नव्हती. उलट ते सोनिया – राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू राहिले होते. पण राजस्थान एपिसोडनंतर त्यांचे हे स्थान डळमळले आहे. म्हणूनच त्यांनी आनंद शर्मा यांना भेटीची वेळ देऊन मध्यरात्री चर्चा केली आहे का??… संशयाला वाव आहे.
अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीतून माघार घेतली असली तरी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर सोपविला आहे. आता जर सोनिया गांधी यांनी प्रतिकूल निर्णय घेतला तर… अशोक गहलोत हे आपला आधीचा निर्णय फिरवतील का?? ते काँग्रेसचे नेहरू गांधी परिवार निष्ठ उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याऐवजी जी 23 गटाचे उमेदवार होतात का??, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे… बऱ्याच दिवसांनी काँग्रेसमध्ये घडलेल्या मध्यरात्रीच्या खलबतांचा हा “पॉलिटिकल एंड” तर नसेल??
Will Ashok Gehlot be a Congress presidential candidate of g23 group within the party??
महत्वाच्या बातम्या
- मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधितांना 755 कोटी रुपयांची विशेष मदत; 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
- मोफत प्रवासाचा 1 महिना : महाराष्ट्रात 55 लाख जेष्ठ नागरिकांनी घेतला एसटीच्या योजनेचा लाभ
- PFI ची बँक खाती सील, संघटनेवर बंदी, पण केरळात बस तोडफोडीची वसूल करणार 5.20 कोटी भरपाई!
- PFI ची बँक खाती सील, संघटनेवर बंदी, पण केरळात बस तोडफोडीची वसूल करणार 5.20 कोटी भरपाई!