• Download App
    पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये ; भाजप खासदार पतीची घटस्फोटाची तयारी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद घरापर्यंत|Wife in Trinamool Congress; BJP MP's husband prepares for divorce Political controversy in West Bengal to the house

    पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये ; भाजप खासदार पतीची घटस्फोटाची तयारी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद घरापर्यंत

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला राजकीय गोंधळ आता नेत्यांच्या घरांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील बिष्णुपूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी सौमित्र खान यांनी आता पत्नीला घटस्फोट देण्याचे ठरवले आहे. Wife in Trinamool Congress; BJP MP’s husband prepares for divorce
    Political controversy in West Bengal to the house

    एका वृत्तवाहिनीशी बोलताना सौमित्र खान यांनी तृणमूल काँग्रेसवर आपले प्रेम हिसकावून घेतल्याचा आरोप केला. घटस्फोटावर खान म्हणाले, “तृणमूल काँग्रेसने माझे प्रेम हिसकावले आणि सुजाताने त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे घटस्फोट हा सर्वात मोठा आणि सर्वोत्तम निर्णय आहे.”



    याआधी सुजाता मंडल म्हणाल्या की, माझ्या आवडत्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यामुळे मी तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुवेंदू अधिकारी यांना भाजपने पक्षात स्थान का दिले, असा संताप सुजाता मंडल यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    त्याचवेळी, अधिकारी यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सौमित्र खान म्हणाले की, सुवेन्दू अधिकारी हे पश्चिम बंगालचे आयकॉन आहेत. नुकताच TMC चा राजीनामा देणारे अधिकारी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात सामील झाले होते.

    Wife in Trinamool Congress; BJP MP’s husband prepares for divorce Political controversy in West Bengal to the house

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही