• Download App
    पत्नीला सेक्स वर्करइतकाही अधिकार नाही? इच्छेविरुध्द संभोग बलात्कारच, दिल्ली उच्च न्यायालयाचे मत|Wife has no rights like sex worker? Sexual intercourse against one's will is rape, says Delhi High Court

    पत्नीला सेक्स वर्करइतकाही अधिकार नाही? इच्छेविरुध्द संभोग बलात्कारच, दिल्ली उच्च न्यायालयाचे मत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पत्नीला सेक्स वर्करइतकाही अधिकार नाही का? पत्नीचा अधिकार सेक्स वर्करपेक्षा कमी आहे का? आणि तिला नाही म्हणण्याचा अधिकार नाही? असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.Wife has no rights like sex worker? Sexual intercourse against one’s will is rape, says Delhi High Court

    बलात्काराच्या कक्षेतून काही विशिष्ट परिस्थिती वगळणे योग्य नाही आणि कायद्याने दिलेल्या संरक्षणाच्या अधिकारानुसार वैवाहिक बलात्काराची चौकशी केली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.



    न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने आयपीसीच्या कलम ३७५ (बलात्कार) अंतर्गत दिलेला अपवाद का वगळण्यात यावा, याबाबत न्यायालयाने नियुक्त केलेल्या अ‍ॅॅमिकस क्युरीचा युक्तिवाद ऐकला. न्यायमूर्ती राजीव शकधर म्हणाले की, बलात्कार कायदा संमतीशिवाय बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या प्रकरणात कोणतीही सूट देत नाही.

    पत्नीच्या हक्कांवर गदा का आणायची, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी चिंता व्यक्त केली. महिला कोणत्याही स्तरावर नाही म्हणू शकतात. त्याचबरोबर पत्नीचे अधिकार कमी करता येतात का आणि तिला कायदेशीरदृष्ट्या कमी अधिकार का द्यायचे, असा सवालही उपस्थित केला. न्यायमूर्ती शंकर म्हणाले की, वैवाहिक संबंधांच्या बाबतीत सेक्सची अपेक्षा सेक्स वर्करसारखी नसते.

    Wife has no rights like sex worker? Sexual intercourse against one’s will is rape, says Delhi High Court

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र