पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान यावरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे.Why Modi government does not bring ordinance? Priyanka Gandhi’s question
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान यावरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे.यावरून आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नरेंद मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की ‘मोदींच्या निर्णयावर विश्वास कसा ठेवायचा.मोदी सरकार अध्यादेश का आणत नाही? निवडणुका लागल्यावरच अध्यादेश काढणार का?, असा सवालही प्रियंका गांधी यांनी केला.
पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या की , शेतकऱ्यांची हत्या केली जात होती. तसेच त्यांना अटक, मारहाण केली जात होती. तेव्हा तुमचं सरकार हा अन्याय करत होत आणि आज तुम्ही म्हणता कायदे मागे घेतो. मग तुमच्यावर आम्ही विश्वास कसा विश्वास ठेवायचा?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.
Why Modi government does not bring ordinance? Priyanka Gandhi’s question
महत्त्वाच्या बातम्या
- अर्थचक्र पूर्वपदावर येण्यासाठी खासगी गुंतवणुक सुरु व्हावी – शक्तिकांत दास
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 26 नोव्हेबरचा पुणे दौरा तात्पुरता स्थगित
- AB de Villiers retirement : एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून घेतला संन्यास, आयपीएलही खेळणार नाही
- तीन कृषी कायदे : काय होत्या तरतुदी, शेतकऱ्यांचा काय होता फायदा? वाचा सविस्तर…