• Download App
    भारतात पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष का केला ?म्हणून विरोध करणार्‍या विद्यार्थिनीला जीवे मारण्याच्या धमक्याWhy did they celebrate Pakistan's victory in India? Why did they celebrate Pakistan's victory in India?

    INDIA VS PAK : भारतात पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष का केला ?म्हणून विरोध करणार्‍या विद्यार्थिनीला जीवे मारण्याच्या धमक्या

    • पोलिसांना माहिती दिल्याचा आरोप करीत छळ.

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर:पाकिस्तानी विजयाचा जल्लोष करणार्‍या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना विरोध करणार्‍या अनन्या जमवाल हिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. Why did they celebrate Pakistan’s victory in India? Why did they celebrate Pakistan’s victory in India?

    काश्मीर पोलिसांनी पाकी विजयाच्या जल्लोष प्रकरणी शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोह आणि आयपीसीच्या कलमांतगंत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर सातत्याने हे प्रकरण वाढतच आहे.


    AGAIN INDIA VS PAK : भारत-पाक सामन्यातील विक्रमांचा पाकला विसर ! हरभजनची धडाकेबाज ‘बोलिंग’ आणि मोहम्मद आमिर गपगार ! फिक्सर को सिक्सर-दोघांमध्ये तुफान ट्विटर वॉर….


    या विद्यार्थ्यांना जल्लोषाचे वेळी विरोध करणारी विद्यार्थिनी अनन्या जमवाल हिचे छायाचित्र आता स्थानिक विद्यार्थी संघटनांनी समाजमाध्यमांवर टाकायला सुरुवात केली असून, पोलिसांना माहिती देत असल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे. शिवाय तिला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनन्याने सांगितले होते की, जल्लोषाच्या वेळी पाकिस्तान जिंदाबादचेही नारे लावण्यात आले होते. आता तिचा जीव धोक्यात असून, संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, असे पोलिस महासंचालकांनी म्हटले आहे.

    पाकिस्तानातूनही ट्विट्स

    शैक्षणिक संस्थेत झालेल्या चुकीच्या कृत्याविरोधात आवाज उठवल्याने अनन्याला लक्ष्य केले जात आहे. तिच्याविरोधात पाकिस्तानातूनही ट्विट्स केले जात आहेत. पाकिस्तानातील एका ट्विटर हॅण्डलवर अनन्याचे छायाचित्र टाकत तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

     

    Why did they celebrate Pakistan’s victory in India? Why did they celebrate Pakistan’s victory in India?

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    India-EU FTA : केंद्राने EUच्या सफरचंदांवर आयात शुल्क कमी केले; 50 ऐवजी 20% केले, हिमाचल सफरचंद उद्योगावर संकट

    Supreme Court : SIR वर सुनावणी- सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; याचिकाकर्ते म्हणाले- ECI मनमानी करू शकत नाही

    Beating Retreat 2026 : विजय चौकात बीटिंग रिट्रीट समारंभ; तिन्ही सशस्त्र दलांनी राष्ट्रपती मुर्मू यांना राष्ट्रीय मानवंदना दिली; उपराष्ट्रपती आणि PM देखील उपस्थित