• Download App
    कोणत्या राज्यात हिंदूंच्या मागणीवर अल्पसंख्याक दर्जा नाही, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी|Which state does not have minority status on the demand of Hindus, Supreme Court hearing

    कोणत्या राज्यात हिंदूंच्या मागणीवर अल्पसंख्याक दर्जा नाही, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नऊ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी केली. कोणत्या राज्यात कमी लोकसंख्या असतानाही हिंदूंना अल्पसंख्याकाचा दर्जा मागितल्यावरही मिळाला नाही, अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्याकडे केली.Which state does not have minority status on the demand of Hindus, Supreme Court hearing

    याचिकाकर्त्याचे वकील अरविंदर दातार म्हणाले, कोर्टाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडून या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होईल.



    त्याआधी न्या.यू.यू. ललित म्हणाले, एखादे ठोस प्रकरण असेल, ज्यात मिझोराम किंवा काश्मीरमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्यास नकार दिला असेल तर विचार करू शकतो.

    दातार म्हणाले, १९९३ च्या अधिसूचनेत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी आणि जैन राष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्याक आहेत. न्यायालयाने राज्यांना अल्पसंख्याक अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. अशात अापण हिंदूंना अल्पसंख्याकाच्या दर्जापासून वंचित ठेवण्याचे म्हणत आहोत. त्यावर ठोस स्थिती पाहू, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

    Which state does not have minority status on the demand of Hindus, Supreme Court hearing

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य