• Download App
    Karnataka Election 2023 : ‘’तर आमचे सर्वच्या सर्व बजरंगी काँग्रेसला...’’ देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान! Which antinational act has been done by Bajrang Dal show one act Fadnvis

    Karnataka Election 2023 : ‘’तर आमचे सर्वच्या सर्व बजरंगी काँग्रेसला…’’ देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान!

    ‘’जे देश हिताचं कार्य करताय त्यांच्यावर बंदी म्हणजे, देशभक्तांवर बंदी घालणे’’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणूकीस अवघे काही दिवस शिल्लक आले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोप-प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीबाबत करण्यात आलेल्या उल्लेखानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपाने या मुद्य्यावरून काँग्रेस विरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली असून, आता हे काँग्रेसला महागात पडणार असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधानही केलं आहे. Which antinational act has been done by Bajrang Dal show one act Fadnvis

    कर्नाटकात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘’या देशात जर कोणी म्हटले की आम्ही बजरंग दलावर बंदी आणू, तर कोण सहन करेल? असं कोणतं देशविरोधी कृत्य बजरंग दलाने केलंय?, एक कृत्य दाखवा. जे देश हिताचे कार्य करत आहेत, देशासाठी लढत आहेत. त्यांच्यावर बंदी घालणे म्हणजेच देशभक्तांवर बंदी घालणे, याचा अर्थ तुम्ही देशद्रोह्यांना साथ देत आहात आणि हे काँग्रेसने या अगोदरही केलं आहे.’’

    याचबरोबर ‘’ राहुल गांधींना ‘भारत तेरे टुकड़े होंगे पचास’ असं म्हणणाऱ्यासोबत उभा राहिलेलं आपण पाहीलं आहे. त्यामुळे जर तुम्ही म्हणाल की आम्ही बजरंग दलावर बंदी घालू, तर आमचे सर्वच्या सर्व बजरंगी ज्यांना बजरंगबलीचा आशीर्वाद आहे, ते काँग्रेसला त्यांची जागा दाखवतील.’’ असा सूचक इशाराही फडणवीसांनी दिला.

    याशिवाय ‘’कर्नाटक मोदी, भाजपाबरोबर आहे आणि कर्नाटकात आमच्या बोम्मईंच्या नेतृत्वातील सरकार पुन्हा निवडून येते आहे. आता काँग्रेसच्या लक्षात आलं आहे की कशाप्रकारे लोकांमध्ये संताप आहे आणि काँग्रेसचा खोटारडा चेहरा समोर आला आहे. आता त्यांनी कितीही काही म्हटलं तरी जे त्यांच्या मनात काय होतं ते त्यांच्या ओठावर आलं.’’ असं फडणवीस म्हणाले आहेत.

    Which antinational act has been done by Bajrang Dal show one act Fadnvis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही