• Download App
    कायदा लागू करण्याची आणि कायदा रद्द करण्याची ही कोणती पद्धत? 700 शेतकऱ्यांचा मृत्यू पंतप्रधानांच्या चुकीमुळे झालाय ; खासदार राहुल गांधी | What is the method of enforcing and repealing the law? 700 farmers die due to PM's mistake; MP Rahul Gandhi

    कायदा लागू करण्याची आणि कायदा रद्द करण्याची ही कोणती पद्धत? 700 शेतकऱ्यांचा मृत्यू पंतप्रधानांच्या चुकीमुळे झालाय ; खासदार राहुल गांधी

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या 3 कृषी कायद्या विरोधात शेतकर्यांनी जवळपास एका वर्षापासून आंदोलन केले होते. गुरुनानक जयंती दिवशी पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्यात आले आहेत असे जाहीर केले होते. याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारचे आभार मानले आहेत. आनंदही व्यक्त केला आहे. आणि त्याचप्रमाणे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपवरही निशाणा देखील साधला आहे.

    What is the method of enforcing and repealing the law? 700 farmers die due to PM’s mistake; MP Rahul Gandhi

    राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांच्या एका चुकीमुळे 700 शेतकरी लोक मारले गेले आहेत. पंतप्रधानांच्या चुकीमुळेच हे अांदाेलन सुरु झाले. त्यांनी चूक स्वीकारली असेल तर आता नुकसान भरपाई देखील द्यावी. आम्हाला हे सुरवातीपासून माहीत होते की, देशातील तीन चार उद्योगपतींची ताकद भारतातील शेतकर्यांच्या ताकदीसमोर उभी राहू शकणार नाही.


    Rahul Gandhi Tweet Viral: ‘लिहून घ्या माझे शब्द, सरकारला शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागतील’, राहुल गांधींचे 10 महिने जुने ट्विट व्हायरल


    पुढे ते म्हणाले, शेतकरी आंदोलन केंद्र सरकारच्या चुकीमुळे झाले आहेत. हे कायदे रद्द करताना देखील संसदेमध्ये कोणतीही चर्चा घेण्यात आलेली नाही. हे पाहून सरकार चर्चेला घाबरत का? असा प्रश्न पडला आहे. सरकारने चुकीचे केले हे सरकारला माहीत होते. आणि त्यांच्यामुळेच 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. कायदा लागू करण्याची आणि कायदा रद्द करण्याची ही कोणती पद्धत होती? यावर चर्चा व्हायला हवी होती. असे राहुल गांधी यांचे म्हणणे होते .

    What is the method of enforcing and repealing the law? 700 farmers die due to PM’s mistake; MP Rahul Gandhi

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत