विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस पक्षाचा 139 वर्धापन दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यातून संघ आणि भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला असतानाच भाजपने नेमके 5 प्रश्न विचारून काँग्रेसने काँग्रेस नेमकी कशासाठी आहे “तयार”??, असा बोचरा सवाल केला आहे. What Congress is ready for
काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाने संघाच्या बालेकिल्ल्यातून भाजपला आव्हान देणारे रणशिंग फुंकण्यासाठी महारॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये सुरुवातीला सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे चारही नेते येणार होते. परंतु आता फक्त राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे दोनच नेते येणार असून सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपला नागपूर दौरा रद्द केला आहे.
पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने नागपूर मधल्या महारॅलीची जबरदस्त तयारी केली असून रॅलीला लाखो लोक जमवण्याचा निर्धार केला आहे. या महारॅलीची घोषणाच मूळी “है तैयार हम”, अशी केली आहे. या घोषणेवरूनच भाजपने काँग्रेसला 5 प्रश्न विचारून काँग्रेस नेमकी कशासाठी “तयार” आहे??, असे बोचरे सवाल केले आहेत.
भाजपने एक पोस्टर शेअर करून पुन्हा हारण्यासाठी तुमचे स्वागत आहे, असे खोचक ट्विट केले आहे. मोहब्बत करप्शन की दुकान खोलने के लिए स्वागत है आपका… काँग्रेस वर्धापन दिन नागपूर…, असे या पोस्टरवर नमूद केले आहे. काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?, असा सवाल भाजपने काँग्रेसला केला आहे. भाजपचे ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसला थेट 5 सवाल केले आहेत.
काँग्रेसचे “है तयार हम” अभियान नेमके कशासाठी??
१) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का??
२) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का??
३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का??
४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का??
५) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का??
काँग्रेसने मात्र आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर करून काँग्रेस संघर्ष त्याग आणि तपस्येचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.