• Download App
    पश्चिम बंगालमध्ये सस्पेन्सच... अगदी एक्झिट पोल्स देखील दुभंगलेले! कोणाला काटावरचे बहुमत? की त्रिशंकू विधानसभा? West Bengal The Focus India Exit Poll Results 2021

    West Bengal The Focus India Exit Poll Results 2021: पश्चिम बंगालमध्ये सस्पेन्सच… अगदी एक्झिट पोल्स देखील दुभंगलेले! कोणाला काटावरचे बहुमत? की त्रिशंकू विधानसभा?

    West Bengal The Focus India Exit Poll Results 2021

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : खेला होबे.. की खेला शेष..? खेळ रंगणार की खेळ संपला..? पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल काय असेल, या लाख मोलाच्या प्रश्नाचे उत्तर देताना एक्झिट पोल्सदेखील गांगरले. एक्झिट पोल्सच्या दुभंगण्यावरून स्पष्ट होते, की बंगालमध्ये दीदी आणि मोदी दादा यांच्यामध्ये काँटे की टक्कर आहे आणि जनमताचा नेमका अंदाज एक्झिट पोल्सनादेखील येऊ शकला नाही. दुसरीकडे, त्रिशंकू विधानसभेचीही टांगती तलवार लटकलेली दिसते आहे.    West Bengal The Focus India Exit Poll Results 2021



    टाइम्स नाऊ सी व्होटर यांच्यामते ममता बॅनर्जी १५२-१६४ जागा मिळवून तिसरयांदा सत्तेवर येतील, पण २०१६च्या तुलनेत त्यांना जबरदस्त फटका बसेल. सी व्होटरच्या मते, भाजपला ११५ जागा मिळतील. पी मार्क या नव्या संस्थेने ममतांना १५८ जागा दिल्यात. याउलट रिपब्लिक – सीएनएक्सच्या मते, भाजप कसे बसे बहुमताच्या जवळपास पोहोचेल. तर जन की बात यांनी भाजपला तब्बल १६२ जागा दिल्या आहेत.

     

    West Bengal The Focus India Exit Poll Results 2021

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले