तौत्के चक्रीवादळाने भारताच्या केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या भागांत उडवून दिलेल्या हाहाकारानंतर भारताला आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला या चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो. West Bengal, Odisha at risk of cyclone, now it is Yass cyclone after Totke
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तौत्के चक्रीवादळाने भारताच्या केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या भागांत उडवून दिलेल्या हाहाकारानंतर भारताला आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि पश्चिम बंगालला या चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २३ – २४ मे दरम्यान ‘यास’ चक्रीवादळ बंगालच्या खाडीला धडकण्याची शक्यता आहे. यावेळेस चक्रीवादळाला ‘यास’ हे नाव ओमानकडून देण्यात आलंय. बंगालच्या उपसागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ३१ डिग्री सेल्सिअस आहे. सतत हवामान बदल आणि समुद्राच्या तापमानातील वाढीमुळे असे चक्रीवादळ येत असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे.
भारतीय हवामान विभागातील चक्रीवादळ प्रमुख सुनीता देवी यांच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवड्यात पूर्व-मध्ये बंगाल खाडीत कमी दबाव क्षेत्र तयार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. हवामान विभाग स्थितीवर नजर ठेवून आहे. निम्न दबाव प्रणालीचा वेग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
‘तौत्के चक्रीवादळामुळे’ महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचं समोर आले आहे. या वादळातून देश सावरलाही नाही तोच आणखी येत्या पाच दिवसांत आणखीन एक वादळ भारताला धडकण्याच्या तयारीत आहे. तौत्के चक्रीवादळाचा रोख आता राजस्थानकडे वळलाय.
यामुळे राजस्थानात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. राज्यातील आठ जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे १९-२० मे रोजी देशातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
West Bengal, Odisha at risk of cyclone, now it is Yass cyclone after Totke
महत्वाच्या बातम्या
- सेवा ही संघटन : ‘तौक्ते’चा तडाखा-महाराष्ट्र संकटात ; मुख्यमंत्री ठाकरे घरात-फडणवीस कोकणात
- स्तनपान करणाऱ्या माताही होणार ‘लसवंत’ ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नवीन निर्देश
- दुर्दैवी ! राज्य सरकार आपल्या डॉक्टरांची सुरक्षा करण्याबाबत अजिबात गंभीर नाही ; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले
- ‘शाहू-फुले-आंबेडकर’चा जयघोष करणाऱ्या ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी’ला मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम राखता येईना
- पश्चिम बंगाल, ओडिशाला चक्रवादळाचा धोका, तोत्केनंतर आता यास चक्रीवादळ
- देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे – पवार सरकारवर टीकास्र; गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत!