• Download App
    राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यावरून प. बंगालमधील राजकारणात खळबळ|West Bengal Governor will meet Amit Shah once again

    राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यावरून प. बंगालमधील राजकारणात खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी बहुचर्चित दिल्ली दौरा लांबविला असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना ते पुन्हा भेटणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.West Bengal Governor will meet Amit Shah once again

    राज्यपाल पक्षपाती असल्याची टीका तृणमुल कॉंग्रेस तसेच डाव्या पक्षांनीही केली आहे.धनकर मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या दौऱ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे.



    हा दौरा घटनात्मक शिष्टचारांचा भंग करणारा असल्याचा त्यांचा दावा आहे. निवडणुकीदरम्यान हिंसाचार उसळलेल्या ठिकाणी धनकर यांनी दौरे केल्यामुळे ममता संतापल्या होत्या.गुरुवारी धनकर यांनी शहा यांची भेट घेतली.

    तेव्हाचे छायाचित्र त्यांनी ट्विट केले. ते दिल्लीहून शुक्रवारी पश्चिम बंगालला परतणार होते, पण त्यांनी प्रयाण लांबणीवर टाकले.धनकर यांनी या बैठकीत पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शहा यांना माहिती दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागल्यानंतर बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत.

    West Bengal Governor will meet Amit Shah once again

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे