• Download App
    West Bengal मुर्शिदाबाद मधून हिंदू कुटुंबांचे झारखंडच्या पाकूर मध्ये कायमचे स्थलांतर; ममतांचा बंगाल पोहोचला काश्मीरच्या वळणावर!!

    मुर्शिदाबाद मधून हिंदू कुटुंबांचे झारखंडच्या पाकूर मध्ये कायमचे स्थलांतर; ममतांचा बंगाल पोहोचला काश्मीरच्या वळणावर!!

    नाशिक : Waqf सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रस्ताळी भूमिका घेतल्यानंतर त्या राज्यातल्या कट्टरपंथी मुस्लिमांना चेव आला आणि त्यांनी मुर्शिदाबाद, जंगीपूर, मालदा या जिल्ह्यांमध्ये दंगली घडविल्या, पण या दंगलीच्या निमित्ताने तिथून त्यांनी हिंदू समाजाला कायमचे पलायन करायला भाग पाडले. याच्या बातम्या मात्र मराठी माध्यमांमध्ये फारशा आल्या नाहीत.

    मुर्शिदाबाद आणि जंगीपूर मधली स्थिती सर्वसामान्य झाले असून तिथून बाहेर पडलेल्या हिंदू कुटुंबांपैकी 19 कुटुंबे परत आपापल्या घरी आल्याचा दावा पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या सरकारने केला. त्याच्या बातम्या बंगाली माध्यमांनी आणि हिंदी इंग्रजी माध्यमांनी ठळकपणे छापल्या, पण प्रत्यक्षात मुस्लिमांनी दंगल करून मुर्शिदाबाद मधून कायमचे हाकलून दिलेल्या काही हिंदू कुटुंबांनी मुर्शिदाबाद मध्ये परत जायला नकार देऊन पश्चिम बंगाल झारखंड सीमेवरच्या पण झारखंडच्या हद्दीतल्या पाकूर मध्ये कायमचा आश्रय शोधलाय. या हिंदू कुटुंबांना पश्चिम बंगाल मधल्या मुर्शिदाबाद मध्ये परत जायचे नाही, असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला स्पष्ट सांगितले. याचा अर्थच हिंदू कुटुंबे मुर्शिदाबाद मध्ये सुरक्षितरित्या परतली, हा ममता बॅनर्जी सरकारने केलेला दावा खोटा ठरला… आणि नेमकी हीच घटना ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालचा जम्मू-काश्मीरच्या वळणावर आल्याचे चिन्ह दर्शवणारी ठरली.

    1990 च्या दशकामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार असताना काश्मीर खोऱ्यातून अशाच दंगली आणि कारस्थाने घडवून हिंदू परिवारांना तिथून कायमचे हकलून देण्यात आले सुरुवातीला त्यांना जम्मूतल्या शिबिरांमध्ये ठेवण्यात आले पण त्यांनी परत कधीच आपल्या घरी परतू नये अशी राजाकीय व्यवस्था अब्दुल्ला + गांधी आणि मुफ्ती या सगळ्यांच्या सरकारांनी केली. 1990 नंतर 2025 पर्यंत काश्मीरमध्ये राजवटी अनेक बदलल्या पण काश्मिरी हिंदू आपल्या काश्मीर खोऱ्यातल्या घरांमध्ये परत जाण्याची व्यवस्था कुठल्याही सहकारांनी केली नाही किंवा त्यांना खात्रीची सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही‌. त्यामुळे काश्मीरच्या खोऱ्यातून बाहेर पडलेली हिंदू कुटुंबिक कायमची आपल्या मूळ भूमीत जाण्यापासून वंचित राहिली.

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने राज्याला असेच काश्मीरच्या वळणावर आणून ठेवलेय. मुर्शिदाबाद, मालदा आणि जंगीपूर पेटल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतः तिथे गेल्या नाहीत. मात्र त्याआधी त्यांनी ईदच्या निमित्ताने फुर्फुरा शरीफला जरूर भेट दिली. तिथे जाऊन त्यांनी हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे लेक्चर दिले. त्या पलीकडे जाऊन आज तर त्यांनी मुर्शिदाबाद आणि जंगीपूर इथल्या हिंदू समाजाच्या जखमेवर मीठ चोळले. त्यांनी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम मध्ये मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम समाजाच्या नेत्यांची waqf सुधारणा कायद्याच्या विरोधातली लढाई पुढे कशी नेता येईल, याविषयीची चर्चा केली. Waqf सुधारणा कायदा इस्लामविरोधी आहे, अशी फेक न्युज पसरवून मुस्लिम समाजाला भडकवायचे कारस्थान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि अन्य इस्लामी संघटनांनी आखले‌. त्यांनी मुर्शिदाबाद जंगीपूर आणि मालदा पेटवून दिले पण ममता बॅनर्जींनी त्या विरोधात चकार शब्द उच्चारला नाही.

    मुर्शिदाबाद जिल्ह्यात आंदोलनाच्या नावाखाली हिंसक टोळ्यांनी पोलिसांवर हल्ले केले, अनेक हिंदू नागरिकांच्या घरांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर आगी लावल्या आणि तीन हिंदू नागरिकांची हत्या केली (हा आकडा बंगाल \सरकारने घोषित केला आहे). हे सर्व प्रकार घडत असतानाही पोलीस यंत्रणा केवळ प्रेक्षकाची भूमिका घेताना दिसली. परिस्थिती फारच हाताबाहेर जायला लागल्यावर शेवटी लष्कर आणि निमलष्करी दलाला पाचारण करावे लागले. पण ममता बॅनर्जी मात्र, आजही मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणातच रंगून राहिल्या.

    West Bengal got turn like Kashmir over Hindu exodus

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’

    मुर्शिदाबाद मध्ये NCW अध्यक्षांसमोर दंगल पीडित महिलांचा प्रचंड आक्रोश; त्यांचे दुःख आणि वेदना मांडायला शब्द अपुरे!!