• Download App
    West Bengal : पूर्व मिदनापूरच्या इगरामध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू Explosion in an illegal firecracker factory in Egra of East Midnapore has claimed six lives 

    West Bengal : पूर्व मिदनापूरच्या इगरामध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू

    फॅक्टरीतून उठणारे आगीच्या लोळ आणि धूर पाहून लोक घाबरले.

    विशेष प्रतिनिधी

    मेदिनीपूर : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर  इगरा येथून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील बॉम्ब बनवण्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. Explosion in an illegal firecracker factory in Egra of East Midnapore has claimed six lives

    मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढू शकते. हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण परिसर हादरला. फॅक्टरीतून उठणारे आगीच्या लोळ आणि धूर पाहून लोक घाबरले. घाईघाईत घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष व अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच इगरा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.

    तृणमूल काँग्रेसचे नेते भानू बाग यांच्या घरात हा स्फोट झाल्याचे पोलिसांच्या माहितीत उघड झाले आहे. कारखान्याच्या मागे काही देशी बॉम्ब बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मोठ्या आवाजात झालेल्या बॉम्बस्फोटांनी लोकांमध्ये घबराट पसरली. लोकांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना घटनास्थळी जळालेले मृतदेह दिसला. जळालेले मृतदेह पाहून घाबरलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

    West Bengal Explosion in an illegal firecracker factory in Egra of East Midnapore has claimed six lives

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!