• Download App
    निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींचे कोलकात्यात धरणे आंदोलन सुरू | West Bengal CM Mamata Banerjee sits on dharna at Gandhi Murti, as a mark of protest after the Election Commission of India (ECI) imposed a ban on her

    निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींचे कोलकात्यात धरणे आंदोलन सुरू

    वृत्तसंस्था

    कोलकाता – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागतिल्यावरून दोषी ठरवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचार करण्यावर बंदी घातली आहे. पण आता या बंदीच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी या कोलकात्याच्या गांधी मूर्तीपाशी धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. West Bengal CM Mamata Banerjee sits on dharna at Gandhi Murti, as a mark of protest after the Election Commission of India (ECI) imposed a ban on her

    तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने नियमानुसार ममता बॅनर्जी यांच्या भाषणाची छाननी केली. त्यांच्याकडून त्यावर लेखी स्पष्टीकरण मागविले आणि त्यानंतर त्यामध्ये धर्माच्या आधारावर ममतांनी मते मागितल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्यावर २४ तासांची निवडणूक प्रचारबंदी घातली.



     

    ही प्रचारबंदी काल रात्री ८.०० पासून सुरू झाली असून ती आज रात्री ८.०० वाजता संपणार आहे. मात्र, या निर्णयाच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील गांधी मूर्तीपाशी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची घोषणा त्यांनी काल रात्रीच केली होती.

    -अल्पसंख्याक मतदारांना ममतांचे आवाहन

    ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम मतदारांना भाजपचा पराभव करण्यासाठी एकजूटीने तृणमूळ काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. पश्चिम बंगालमधले फुर्फुरा शरीफचे मौलवी अब्बासी आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे भाजपची बी टीम आहेत. भाजपकडून पैसे घेऊन ते मुसलमानांची मते फोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मतदान करणे म्हणजे तृणमूळ काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपला मदत करण्यासारखेच आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभांमध्ये केला होता.

    त्यांच्या भाषणांविरोधात विविध पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने ममतांच्या भाषणाची छाननी करून त्यांच्या प्रचारावर २४ तासांची बंदी घातली. त्यानुसार आज रात्री ८.०० वाजेपर्यंत त्यांना प्रचारात भाग घेता येणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

    West Bengal CM Mamata Banerjee sits on dharna at Gandhi Murti, as a mark of protest after the Election Commission of India (ECI) imposed a ban on her

     

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के