• Download App
    सीतालकुचीत ममतांचा सांत्वन दौरा; हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना भेटल्या West Bengal CM Mamata Banerjee met the families of those killed in the Sitalkuchi, Cooch Behar violence

    सीतालकुचीत ममतांचा सांत्वन दौरा; हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना भेटल्या

    वृत्तसंस्था

    कुचबिहार – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कुचबिहारच्या सीतालकुचीत सांत्वन दौरा काढला. त्या तेथे हिंसाचारात मरण पावलेल्या चार व्यक्तींच्या नातेवाईकांना भेटल्या आणि निवडणूक संपल्यावर मदतीचे आश्वासन दिले. West Bengal CM Mamata Banerjee met the families of those killed in the Sitalkuchi, Cooch Behar violence

    ममता दीदी आम्हाला येऊन भेटल्या. त्यांनी निवडणूक संपल्यावर मदतीचे आश्वासन दिले आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, असे मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

    ममता बॅनर्जी यांनी मतदारांना केंद्रीय दलांचा घेराव करा, असे आवाहन केले होते. त्यानंतर सीतालकुचीत मतदानाच्या वेळी जमावाने सीएपीएफ जवानाला घेरून त्याची रायफल खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार झाले होते.

    या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे राजकारण पेटले. सीतालकुचीत जाऊन आपण त्या परिवारांचे सांत्वन करू, असे ममतांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार आज त्या तेथे गेल्या होत्या. मात्र, त्याच दिवशी भाजपच्या एका कार्यकर्त्याची तृणमूळच्या गुंडांनी हत्या केली. त्याच्याविषयी ममतांनी अश्रू ढाळले नाहीत, असे टीकास्त्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोडले होते.

    विशेष बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे