BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर याची घोषणा केली. ते म्हणाले की, मी राजकारणात सामाजिक कार्य करण्यासाठी आलो होते, पण आता मला वाटते की, हे काम राजकारणापासून दूर राहूनही करता येते. West Bengal BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics, Wrote A Post On Facebook
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर याची घोषणा केली. ते म्हणाले की, मी राजकारणात सामाजिक कार्य करण्यासाठी आलो होते, पण आता मला वाटते की, हे काम राजकारणापासून दूर राहूनही करता येते. राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर करताना ते म्हणाले, “अलविदा. मी कोणत्याही राजकीय पक्षाकडे जात नाही. टीएमसी, काँग्रेस, माकपने मला कोणीही बोलावले नाही. मी कुठेही जात नाहीये. सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्हाला राजकारणात येण्याची गरज नाही. राजकारणापासून दूर राहूनही मी माझा हेतू पूर्ण करू शकतो.”
बाबुल सुप्रियो यांनी असेही म्हटले आहे की, ते एका महिन्याच्या आत सरकारी निवासस्थान सोडतील आणि खासदारकीचाही राजीनामा देतील. गेल्या काही दिवसांपासून बाबुल सुप्रियो यांच्या भाजपमधील कमी पडणाऱ्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. असा अंदाजही लावला जात होता की, ते काही मोठा निर्णय घेऊ शकतात.
West Bengal BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics, Wrote A Post On Facebook
महत्त्वाच्या बातम्या
- रामदास आठवलेंनी ममता बॅनर्जींना दिले उत्तर, म्हणाले- 2024 मध्ये ‘खेला’ नहीं, मोदी का मेला होगा’
- आसाम – मिझोराम हिंसक सीमावादाच्या पार्श्वभूमी positive news; आसाम – नागालँड यांच्यात सीमावादावर शांतता राखण्याचा तोडगा
- जगाला कोरोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनमध्ये परिस्थिती चिघळली, बीजिंगसहित 15 शहरांमध्ये पसरला डेल्टा व्हेरिएंट
- पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींनी घेतली लॉकडाऊनने पीडित व्यापाऱ्यांची भेट, म्हणाले- जोपर्यंत पीएम आणि सीएम येणार नाहीत, व्यापाऱ्यांनी GST भरू नये!
- नास्तिक CPIचा प्रभू श्रीरामांना लाल सलाम : कम्युनिस्टांचे रामायणावर वर्ग; राइट विंग आणि संघाला आव्हान देण्याची तयारी