• Download App
    West bengal assembly elections 2021 results updates; चॅनेली चर्चांच्या पलिकडे, तृणमूळ काँग्रेस ५१ टक्के मते, भाजप ३५ टक्के मते|West bengal assembly elections 2021 results updates; TMC 51%, BJP 35%

    West bengal assembly elections 2021 results updates : चॅनेली चर्चांच्या पलिकडे, तृणमूळ काँग्रेस ५१ टक्के मते, भाजप ३५ टक्के मते

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये चॅनेली चर्चांच्या पलिकडे निवडणूक आयोगाच्या आकड्यांकडे नजर टाकली तर तीन राऊंडमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसला ५१ टक्के मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजपला ३५ टक्के मते मिळाली आहेत.West bengal assembly elections 2021 results updates; TMC 51%, BJP 35%

    तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, तृणमूळ काँग्रेस ११२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ५८ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस – डावी आघाडी २ जागांवर आघाडीवर आहे.



    नंदीग्राममध्ये सव्वा तासाच्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये पिछाडीवर चालल्या आहेत. एकेकाळचे त्यांचे उजवे हात सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. त्यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे.

    विविध चॅनेलच्या चर्चांनुसार तृणमूळ काँग्रेस १९४ तर भाजप ९४ जागांवर आघाडीवर असल्याने बंगालची लढाई एकतर्फी होत असल्याचे दिसते आहे. पहिल्या सव्वा तासात निवडणूक कोणाच्याच बाजूने एकतर्फी होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. पण सव्वा दोन तासांनंतर आकडे सारखे बदलत असले तरी त्यांच्यातले अंतर वाढताना दिसत आहे.

    या सगळ्यात काँग्रेस आणि डावे पक्ष तसेच फुर्फुरा शरीफ वाऱ्यावर उडून गेलेले दिसत आहेत. डाव्या पक्षांची आघाडी फक्त २ जागांवर आघाडीवर दिसत आहे

    West bengal assembly elections 2021 results updates; TMC 51%, BJP 35%

    Related posts

    Justice Verma : जस्टिस वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू; सरकार- विरोधी पक्षातील 215 खासदार एकत्र

    Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; वैद्यकीय कारणास्तव पदत्याग

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा