• Download App
    West bengal assembly elections 2021 results updates; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर, सुवेंदू अधिकारी आघाडीवर|West bengal assembly elections 2021 results updates

    West bengal assembly elections 2021 results updates : ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर, सुवेंदू अधिकारी आघाडीवर

    वृत्तसंस्था

    कोलकाता : नंदीग्राममध्ये सव्वा तासाच्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये पिछाडीवर चालल्या आहेत. एकेकाळचे त्यांचे उजवे हात सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. त्यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे.West bengal assembly elections 2021 results updates

    तृणमूळ काँग्रेस ९९ तर भाजप ९४ जागांवर आघाडीवर असल्याने बंगालची लढाई अत्यंत चुरशीच्या अवस्थेत पोहोचली आहे. ममता बॅनर्जी स्वतःच हरल्या तर त्या काय करतील , तसेच त्यांचे रणनीतीकार प्रशांत किशोर आपले निवडणूक रणनीतीकाराचे काम सोडून देतील का,याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


    West bengal assembly elections 2021 results analysis : ममतादीदी हरोत किंवा जिंकोत… त्या बंगालमधून बाहेर पडतील…?? निदान बंगाली अस्मितेचा इतिहास तरी तसे दर्शवत नाही…


    पहिल्या सव्वा तासात निवडणूक कोणाच्याच बाजूने एकतर्फी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण आकडे सारखे बदलत असले तरी त्यांच्यातले अंतर ५ जागांपेक्षा अधिक नाही.

    त्यामुळे बंगालमध्ये त्रिशंकू विधानसभेची चर्चाही जोर धरताना दिसत आहे. या सगळ्यात काँग्रेस आणि डावे पक्ष तसेच फुर्फुरा शरीफ वाऱ्यावर उडून गेलेले दिसत आहेत. डाव्या पक्षांची आघाडी फक्त २ जागांवर आघाडीवर दिसत आहे.

    West bengal assembly elections 2021 results updates

    महत्वाच्या  बातम्या

     

    Related posts

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??

    Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती म्हणाले- कोचिंग सेंटर संस्कृती धोकादायक; हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पालन करत नाहीत