• Download App
    ममतादीदी हरोत किंवा जिंकोत... त्या बंगालमधून बाहेर पडतील...?? निदान बंगाली अस्मितेचा इतिहास तरी तसे दर्शवत नाही... West bengal assembly elections 2021 results analysis

    West bengal assembly elections 2021 results analysis : ममतादीदी हरोत किंवा जिंकोत… त्या बंगालमधून बाहेर पडतील…?? निदान बंगाली अस्मितेचा इतिहास तरी तसे दर्शवत नाही…

    विनायक ढेरे

    कोलकाता – बंगालच नव्हे, तर हा देशाच्या राजकारणासाठी टर्निंग पॉइंट आहे, असे वर्णन कितीही बहारदार वर्णन देशभरातील पोलस्टार्स आणि रणनीतीकारांनी केले असले, तरी ममता बॅनर्जी बंगालची निवडणूक हरोत किंवा जिंकोत… त्या बंगालमधून बाहेर पडून राष्ट्रीय राजकारणात उडी घेतील… याविषयी बंगाली political anyalists ना शंका वाटते आहे… याचे कारण बंगाली मानसिकतेत आणि ममता बॅनर्जींच्या स्वभावात दडले असल्याचे बोलले जाते. West bengal assembly elections 2021 results analysis

    • बंगालची प्रादेशिकता अधिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय राजकारणाशी कमी नाळ जोड़णारी राहिलेली आहे… हे कम्युनिस्ट राजवटीपासून म्हणजे किमान ४० ते ४५ वर्षांपासून स्पष्ट झाले आहे… ज्योती बसूंसारख्या नेत्याला पंतप्रधानपदाची संधी येऊनही वंचित ठेवणे यात कम्युनिस्टांच्या विशिष्ट मानसिकतेबरोबरच बंगाली लिमिटेड अस्मितेचाही बराचसा भाग महत्त्वाचा मानला गेला आहे. हा इतिहास फार जुना नाही. १९९६ चा आहे.
    • ममता बॅनर्जींचे राजकीय कूळ जरी काँग्रेसचे असले, तरी त्याची पठडी बंगाली मानसिकतेच्या बाहेरची नाही. कारण केंद्रातील मंत्रिपदात रमण्यापेक्षा त्या बंगालच्या राजकारणात जास्त रमल्याचा इतिहास आणि वर्तमान आहे.
    • शिवाय ममता बॅनर्जी या काही महाराष्ट्र लिमिटेड चाणक्यांसारख्या नेत्या नाहीत की सिंगल डिजिट खासदारांच्या बळावर पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगायची आणि तिथे खऱ्या चाणक्याकडून मार खाल्यावर मुकाटपणे आपल्या राज्यात परत यायचे…
    • असले उद्योग ममता बॅनर्जींनी केल्याचा इतिहासाचा दाखला नाही. ममतांनी जे केले ते “डंके की चोट” पर केले. कम्युनिस्टांच्या हिंसक राजकारणाला त्यांनी जिद्दीने पराभूत करून पूर्ण बहुमतासह एकदा नव्हे, तर दोनदा मुख्यमंत्रीपद मिळविले आहे. महाराष्ट्र लिमिटेड चाणक्यांना आपल्या राज्यात विधानसभेत कधी तीन डिजिट जागा मिळविता आल्या नाहीत आणि लोकसभेत ते कधी सिंगल डिजिट जागा ते ओलांडू शकलेले नाहीत.
    • त्यामुळे ममता बॅनर्जी हरोत किंवा जिंकोत… आपल्या फायटर स्पिरीटला जागून त्या बंगालमध्येच राहण्याची शक्यता अधिक आहे. आणि भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार अगदी २०० च्या वर जागा जिंकून ते सत्तेवर आले तरी ममता बॅनर्जी त्यांना बंगालमध्येच राहून सळो की पळो करून सोडतील, अशी शक्यताच बंगाली भाषक वृत्तपत्रे व्यक्त करताना दिसतात.
    • एका निवडणूकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींचे नेतृत्व खचेल, हे मानायला बंगाली भाषक वृत्तपत्रे आणि मीडिया तयार नाही. कारण कम्युनिस्टांच्या केडरचे वर्चस्व तोडून स्वतःच्या तृणमूळ काँग्रेसचे वर्चस्व तळागाळापर्यंत निर्माण करणाऱ्या ममता बॅनर्जींना बंगाली भाषक वृत्तपत्रांनी पाहिले आहे. गेल्या १० वर्षांचा हा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर घडला आहे.
    • शिवाय राज्यशकट चालविण्याचा तुलनेने कमी अनुभव असलेले नेते जर सत्तेवर आले त्यांना हेलपटवणे हे आक्रमक ममतांना अजिबात अवघड नाही… पंतप्रधान मोदींचा नव्या राजवटीला पाठिंबा असला, तरी… “विरोधक” ममता भाजपच्या सत्ताधारी नेत्यांना अनेक पातळ्यांवर भारी ठरू शकतात.
    • त्यामुळेच पराभूत झाल्या तरी ममता बॅनर्जी बंगाल सोडून बाहेर जातील किंवा लगेच राष्ट्रीय राजकारणात शिरतील, असे वाटत नाही. ममता बॅनर्जींसकट कोणत्याही बंगाली नेत्याची अस्मिता तसे दर्शवत नाही…!!

    महत्वाच्या  बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र