वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत हवामान झपाट्याने बदलत आहे. येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. त्यात अनेक डोंगराळ आणि मैदानी राज्यांचा समावेश आहे. हवामान खात्याने काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.Weather Alert Weather has changed in many parts of the country, IMD has issued an alert for a week
काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
काश्मीरमधील किमान तापमानात काही अंशांनी घट झाली आहे. श्रीनगरमध्ये किमान तापमान 0.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे आदल्या रात्रीच्या 3.9 अंश सेल्सिअसपेक्षा तीन अंश कमी आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव आहे. यामुळे बुधवारी रात्री आणि गुरुवारी केंद्रशासित प्रदेशाच्या मध्य आणि उच्च भागात हलका ते मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे. ते म्हणाले की, सध्या जम्मू-काश्मीरमधील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी हलका पाऊस किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशात थंडीची लाट
हिमाचल प्रदेश थंडीच्या लाटेने ग्रासला आहे. गेल्या 24 तासांत काही उंचावरील भागात हलक्या हिमवृष्टीची नोंद झाली. त्याचवेळी मध्यवर्ती भागात पावसाची माहिती आहे. हवामान केंद्राच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांतही हवामान खराब राहील. बर्फवृष्टी आणि थंडीच्या लाटेमुळे कमाल तापमानातही घसरण नोंदवण्यात आली आहे. राजधानी शिमलामध्ये आज सकाळपासून ढगांचा लपंडाव सुरू होता. IMD ने 30 नोव्हेंबरपर्यंत खराब हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. 28 ते 30 नोव्हेंबरपर्यंत येथे हवामान खराब राहील.
गुजरातमध्ये अवकाळी पाऊस
याशिवाय आज आणि उद्या गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आज आणि उद्या गुजरातमधील दाहोद, नर्मदा, डांग, छोटा-उदेपूर आणि वलसाडमध्ये सामान्य पाऊस पडू शकतो. याशिवाय आंध्र प्रदेशातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशच्या काही भागांत 5 डिसेंबरपर्यंत वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने बुधवारी सांगितले.
Weather Alert Weather has changed in many parts of the country, IMD has issued an alert for a week
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचे सर्वात मोठे यश; मणिपूरच्या सर्वात जुन्या बंडखोर गटाने शस्त्रे सोडली, केंद्राशी केला शांतता करार
- सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी!
- मणिपूरमधील मैतेई उग्रवादी संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून न्यायाधिकरणाची स्थापना!
- प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!