Weather alert : महाराष्ट्रात अवकाळीचा अलर्ट; 20 ते 22 एप्रिल वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.