• Download App
    काळा कोट परिधान केला म्हणजे आपले जीवन अन्य लोकांपेक्षा अधिक मौल्यवान नाही, वकिलांच्या कुटुंबाला ५० लाख भरपाईची याचिका फेटाळली|Wearing a black coat means your life is not more valuable than other people's, lawyer's family's Rs 50 lakh compensation petition rejected

    काळा कोट परिधान केला म्हणजे आपले जीवन अन्य लोकांपेक्षा अधिक मौल्यवान नाही, वकिलांच्या कुटुंबाला ५० लाख भरपाईची याचिका फेटाळली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आपण काळा कोट परिधान केला आहे, याचा अर्थ असा नाही की, आपले जीवन अन्य लोकांपेक्षा अधिक मूल्यवान आहे, असे म्हणत कोरोना वा अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या वकिलांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये भरपाई देण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.Wearing a black coat means your life is not more valuable than other people’s, lawyer’s family’s Rs 50 lakh compensation petition rejected

    वकिलांचे जीवन हे अन्य लोकांपेक्षा अधिक मूल्यवान आहे, असे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. विक्रम नाथ आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या पीठाने स्पष्ट केले की, या याचिकेला प्रासंगिक आधार नाही. देशात कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.



    याचिकाकर्ते वकील प्रदीप कुमार यादव यांना न्यायालयाने विचारले की, समाजातील अन्य लोकांना महत्त्व नाही का. आपण काळा कोट परिधान केला आहे, याचा अर्थ असा नाही की, आपले जीवन अन्य लोकांपेक्षा अधिक मूल्यवान आहे.

    यादव यांनी न्यायालयात सांगितले की, ही याचिका परत घेऊ आणि ठोस आधारावर पुन्हा याचिका दाखल करू. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्यास दहा हजार रुपये दंड ठोठावला.

    Wearing a black coat means your life is not more valuable than other people’s, lawyer’s family’s Rs 50 lakh compensation petition rejected

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये