वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आपल्या अयोध्ये संदर्भात लिहिलेल्या पुस्तकात काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्यासारख्या जिहादी इस्लामी संघटनांची केली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी सलमान खुर्शीद यांचे कान टोचले आहेत.We may not agree with Hindutva as a political ideology but comparing it with ISIS and Jihadist Islam is factually wrong and exaggeration
आपण हिंदुत्वाच्या राजकीय प्रणालीच्या विरोधात जरूर असू. परंतु हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्यासारख्या हिंसाचारावर विश्वास ठेवणाऱ्या आणि कट्टर जिहाद मानणाऱ्या संघटनांशी करणे योग्य नाही किंबहुना ते वस्तुस्थितीला धरून नाही, अशा स्पष्ट शब्दांत गुलाम नबी आझाद यांनी सलमान खुर्शीद यांचे कान टोचले आहेत.
गुलाम नबी आझाद हे काँग्रेसमधल्या जी 23 गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी काँग्रेसला कायमचा अध्यक्ष नेमण्याची आग्रही मागणी गेल्या दीड वर्षांपासून लावून धरली आहे. अनेकदा ते काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या देत असतात. तशाच कानपिचक्या त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सलमान खुर्शीद दिग्विजय सिंग आणि पी. चिदंबरम यांना दिल्या आहेत.
सलमान खुर्शीद यांनी पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इस्लामी जिहादी संघटनांची केली, तर या पुस्तक प्रकाशनात दिग्विजयसिंग यांनी सावरकरांच्या राजकीय हिंदुत्वाचा सनातनी हिंदू धर्माशी काहीही संबंध नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याच वेळी पी. चिदंबरम यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या देशात बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली याची कोणाला लाजही वाटली नाही, असे वक्तव्य केले होते.
या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतभेद असले तरी हिंदुत्वाची तुलना इस्लामी जिहादी तत्वांशी करणे योग्य नाही. ते वस्तुस्थितीला धरून नाही अशा शब्दांत गुलाम नबी आझाद यांनी आपल्याच काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे कान टोचलेले आहे आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील आता दुफळी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
We may not agree with Hindutva as a political ideology but comparing it with ISIS and Jihadist Islam is factually wrong and exaggeration
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल