वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस गरिबांचा पैसा लुटत असल्याचा आरोप लोकसभेत पश्चिम बंगाल सरकारवर करण्यात आला. या आरोपींची तत्काळ चौकशी करण्याची मागणीदेखील यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी केली. ते म्हणाले- तृणमूल काँग्रेसचे अर्धा डझन मंत्री तुरुंगात आहेत. सरकारचे शिक्षणमंत्रीदेखील तुरुंगात आहेत. त्याचबरोबर प्रधान यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव घेता त्यांना या मुद्द्यावरून घेरले आहे. ते म्हणाले- पक्षाचे नेतृत्वदेखील तुरुंगात जाणार आहे. त्यामुळेच ते संसदेचा वेळ वाया घालवत आहेत.WATCH Union Minister Dharmendra Pradhan tore Trinamool Congress veil in Lok Sabha; Mamata Banerjee’s Arrest Signals Stir Up
तृणमुल काँग्रेसचे खासदार सुदीप बंधोपाध्याय यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होता. ते म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मनरेगा योजना, प्रंतप्रधान आवास योजना आणि राष्ट्रीय आरोग्य योजनेचा निधी केंद्र सरकारने रखडवलेला आहे. या योजनेचा निधी राज्य सरकारला तत्काळ देण्याची विनंतीदेखील बंधोपाध्याय यांनी केली होती.
बंधोपाध्याय यांनी लोकसभेच्या झीरो प्रहारात हा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले- केंद्राने गेल्या दोन वर्षापासून पश्चिम बंगालवर असलेल्या 18 हजार कोटी रुपयांची थकबाकी भरलेली नाही. या संदर्भात तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रिय मंत्र्यांची भेटदेखील घेतली. मात्र त्यानंतरही या प्रश्नावर काहीही तोडगा काढण्यात आला नाही. दिल्लीत मुद्दा उपस्थित केल्यानंतरही प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता हा पैसा राज्य सरकारला देण्यात यावा, अशी मागणी बंधोपाध्याय यांनी केंद्र सरकारकडे केली. त्याचबरोबर आमचं मत आम्हाला पंतप्रधानांपर्यंत पोहोचवायचं असल्याचेही ते म्हणालेत.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार निर्माण होत असलेल्या पाठ्यपुस्तकांबाबत धर्मेंद्र प्रधान यांची विशेष माहिती
या मुद्द्यावर बोलतांना धर्मेंद्र प्रधान यांनी थेट तृणमुल काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. तृणमुल काँग्रेस गरिबांचा पैसा लुटत असून त्याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, तृणमुल काँग्रेसने केलेला दावा काही अंशी योग्य आहे. भारत सरकारने दिलेल्या पैशांचा राज्य सरकारकडून गैरवापर केला जात आहे. पंतप्रधान पोषण योजनेत पश्चिम बंगाल सरकारने 4 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. हे प्रकरण सरकारने केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवले आहे. या चौकशीतून लवकरच सत्य बाहेर येणार असल्याचे प्रधान म्हणालेत.
WATCH Union Minister Dharmendra Pradhan tore Trinamool Congress veil in Lok Sabha; Mamata Banerjee’s Arrest Signals Stir Up
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…