प्रतिनिधी
कोलकाता : देशातील सर्वात जुनी मेट्रो सेवा असलेल्या कोलकाता मेट्रोने इतिहास रचला आहे. येथे भारतात पहिल्यांदाच नदीखालून मेट्रो धावली आहे. मेट्रोने हुगळी नदीखाली प्रवास केला. हावडा ते कोलकातामधील एस्प्लेनेडपर्यंत ट्रेल रन आयोजित करण्यात आले होते. कोलकाता मेट्रोचे महाव्यवस्थापक पी. उदय कुमार रेड्डी यांनी हा प्रवास कोलकाता शहरासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले.WATCH Metro runs under river for the first time in India, traveled so far in 45 seconds
उदय कुमार रेड्डी म्हणाले की, हुगळी नदीखालून ट्रेन धावण्याची ही पहिलीच वेळ आहे. 33 मीटर खोलीवर हे सर्वात खोल स्टेशन देखील आहे. भारतात पहिल्यांदाच असे घडले आहे. कोलकाता शहरासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. ते म्हणाले की, हावडा मैदान ते एस्प्लेनेड अशी चाचणी पुढील 7 महिने सुरू राहील. त्यानंतर ती लोकांसाठी नियमित सुरू केली जाईल.
- ऐतिहासिक कामगिरी : भारतात पहिल्यांदाच नदीखालून धावली मेट्रो, अवघ्या ४५ सेकंदात पार केलं ‘एवढं’ अंतर!
45 सेकंदांत कापले 520 मीटर अंतर
या वर्षी हावडा-एस्प्लेनेड सेक्शनवर व्यावसायिक सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेट्रोने हुगळी नदीखालील 520 मीटरचे अंतर 45 सेकंदांत कापले. नदीखालील हा बोगदा नदीपात्रापासून 32 मीटर खाली आहे. हा विभाग हावडा मैदान आणि कोलकाताच्या आयटी हब सॉल्ट लेकमधील सेक्टर V ला जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग आहे. हा प्रकल्प कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील एस्प्लेनेड स्टेशनला हावडा आणि सियालदाह येथील भारतीय रेल्वे स्थानकांसोबत जोडेल.
हा विकास कोलकाता मेट्रोसाठी आणखी एक मैलाचा दगड आहे, कारण 1984 मध्ये कोलकाता येथे सुरू झालेली देशातील पहिली मेट्रो रेल्वेदेखील होती. यानंतर राजधानी दिल्लीने 2002 मध्ये मेट्रो सेवा सुरू केली होती.
WATCH Metro runs under river for the first time in India, traveled so far in 45 seconds
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
- कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!