• Download App
    कलम ३७० लागू करण्यापूर्वी काश्मीरमध्ये शांतता होती का? अमित शहा यांचा सवाल|Was there peace in Kashmir before Article 370 was implemented? Question by Amit Shah

    कलम ३७० लागू करण्यापूर्वी काश्मीरमध्ये शांतता होती का? अमित शहा यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : घटनेतील कलम ३७० अनेक दशके लागू होते, पण त्या काळात जम्मू- काश्मीरमध्ये शांतता होती काय, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. २०१९ साली सरकारने घटनेतील ही तरतूद रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये शांतता, उद्योगांतील मोठी गुंतवणूक आणि पर्यटकांचा ओघ यांना सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.Was there peace in Kashmir before Article 370 was implemented? Question by Amit Shah

    जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा बहाल करण्यात येईपर्यंत सरकार या केंद्रशासित प्रदेशात शांतता प्रस्थापित करू शकणार नाही, असे जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना शह म्हणाले, कलम ३७० गेली ७५ वर्षे होते.



    मग तेथे शांतता का नव्हती? शांतता व कलम ३७० यांचा संबंध असेल, तर १९९० साली हे कलम लागू नव्हते का? जर तेव्हा ते असेल, तर मग त्या वेळी शांतता का नव्हती? आता आपण लक्ष्य करून करण्यात आलेल्या हत्यांचा आकडा जमेला धरला, तरीही आपण १० टक्क्यांच्याही जवळ जात नाही. याचाच अर्थ या ठिकाणी शांतता आहे.

    कलम ३७० व कलम ३५ अ रद्द कधी रद्द केले जाऊ शकतील, यावर कुणाचा विश्वास नव्हता असे सांगताना, आपल्या इंग्रजीच्या प्राध्यापकांसोबतच्या संवादाचा त्यांनी संदर्भ दिला. कलम ३७० रद्द करण्याचे भाजपचे आश्वासन जसेच्या जसे पुढील पिढीकडे हस्तांतरित होईल, असे त्यांचे म्हणणे होते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ आॅगस्ट २०१९ रोजी कलम ३७० घटनेतून रद्द केले याचा मला आनंद आहे. काश्मीरमध्ये आता शांतता आहे, गुंतवणूक होत आहे, पर्यटक तेथे येत आहेत आणि जम्मू- काश्मीर हळूहळू उर्वरित देशासोबत संघटितपणे उभे राहू पाहत आहे, असे शहा म्हणाले.

    Was there peace in Kashmir before Article 370 was implemented? Question by Amit Shah

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य